कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी २ कोटी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोपरगावच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी २ कोटी मंजूर – आ. आशुतोष काळे

2 crore sanctioned for roads in rural areas of Kopargaon – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 21:20

 कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारने २ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे. कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांचा अनुशेष भरून काढणे या वचनपूर्तीसाठी महा विकास आघाडी सरकार कडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून तालुक्यातील ग्रामीण रस्ते व पूल दुरुस्तीसाठी लेखाशीर्ष ३०५४/२४१९ अंतर्गत २ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.

यामध्ये दहेगाव येथील विलास देशमुख घर ते गुलाबराव देशमुख घर -१६ लाख, वेस येथील मच्छिंद्र कोल्हे घर ते जालिंदर कोल्हे घर-२० लाख, जेऊर कुंभारी येथील रा.मा. १२ ते संजयनगर वस्ती-२० लाख, सुरेगाव येथील सुरेगाव गावठाण ते यशवंत निकम घर रस्ता-२६ लाख, धामोरी येथील धामोरी वेस रस्ता ते बाळासाहेब दरेकर शेती रस्ता -२० लाख, सोनारी येथील पुंजाबा सांगळे घर ते ज्ञानदेव पवार घर रस्ता -१० लाख, कोळपेवाडी  येथील कोळपेवाडी गाव  ते राज्य मार्ग ७ रस्ता -४० लाख, नाटेगाव येथील किरण कुदळे घर रस्ता ते राजेंद्र मोरे घर रस्ता -१६ लाख, वारी येथील महेश टेके घर रस्ता ते कोळनदी रस्ता -०८ लाख, कासली येथील राजेंद्र मलिक घर रस्ता ते बाबुराव मलिक घर  रस्ता -१६ लाख, उक्कडगाव येथील कैलास निकम घर रस्ता ते देविदास निकम घर रस्ता – ८ लाख या चार रस्ते कामांचा समावेश आहे . उर्वरित रस्त्यासाठी लवकरच निधी मिळवू अशी ग्वाही आमदार काळे त्यांनी यावेळी दिली. कोटी दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page