अभिमानास्पद विकासातून काकडी चे नाव जागतिक स्तरावर पोहोचवा- सौ. स्नेहलता कोल्हे
Promote Kakadis name globally through proud development- Mrs. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 21:25
कोपरगाव : विमानतळामुळे काकडी गाव आंतरराष्ट्रीय नकाशावर आले आहे. आता एकजुटीने अभिमानास्पद विकासातून काकडीचे नाव जागतिक स्तरावर पोहोचवा असे आवाहन भाजपा प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी काकडी, मल्हारवाडी डांगेवाडी येथील ८४ लाखाच्या १७ कामाच्या शुभारंभ व लोकार्पण प्रसंगी केले .
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या निळवंडेचे कामासाठी माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी स्वतःच्या सरकार विरुद्ध संघर्ष करून रस्त्यावर उतरून प्रश्नांची सोडवणूक केली आहे. निळवंडे चे ऐतिहासिक काम अंतिम टप्प्यात नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय जलसंपदा मंत्री, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींचा सिंहाचा वाटा आहे,असे त्या म्हणाल्या, काकडी विमानतळ प्राधिकरणाकडे कररूपाने थकीत ५ कोटी ५० लाख रुपये मिळण्याबाबत गुरुवारी सौ कोल्हे यांनी विमानकंपनी प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन मागणी केली. येथील ग्रामस्थांना शासनाने धडक कृती कार्यक्रम जाहीर करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी सौ.कोल्हे यांनी केली. प्रारंभी सरपंच सौ. पूर्वा रवींद्र गुंजाळ यांनी विकासकामांची माहिती दिली, उपसरपंच भाऊसाहेब सोनवणे यांनी स्वागत केले. कानिफनाथ गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शरद थोरात, विक्रम पाचोरे,गोपाळराव सोनवणे,भिमराज गुंजाळ, साखरबाई सोनवणे, सुगाबाई सोनवणे, अण्णासाहेब गांगवे (सरपंच मनेगांव), दिगंबर कांडेकर, दत्तात्रय गुंजाळ, बाबासाहेब सोनवणे, प्रवीण गुंजाळ, वाल्मीकराव कांडेकर, दत्तात्रय भालेराव, अशोकराव गुंजाळ, नानासाहेब कांदळकर, शिवराम गुंजाळ, सुनील कांडेकर, कानिफनाथ गुंजाळ, विजय डांगे, रामनाथ वेताळ, आदि उपस्थित होते. प्रमोद व अनिल शिंदे यांनी अकराशे वृक्ष दिल्याबद्दल त्यांचा स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पावसाने ओढ दिल्याने आज दुष्काळाची स्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी जगला तर तुम्ही आम्ही जगु. माजी मंत्री शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी आजवरच्या दुष्काळी स्थितीत या पश्चिम भागातील गावांवर विशेष लक्ष केंद्रित करून त्यांना सातत्याने मदतीचा हात दिलेला आहे राजकारणात परिस्थिती नेहमीच बदलत असते. सामान्यांचा मिळवलेला विश्वास टिकवता आला पाहिजे. बाबासाहेब सोनवणे यांनी आभार मानले.
चौकट
दांडा एकाचा अन झेंडा दुसऱ्याचा असं करु नका असे सौ स्नेहलता कोल्हे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.