शांताराम गोसावींनी स्वीकारला कोपरगाव मुख्याधिकारी पदाचा पदभार
Shantaram Gosavi accepted the post of Kopargaon Chief Officer
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu12 August 21:30
कोपरगाव : येथील नगरपरिषदेचे नवनियुक्त मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी मुख्याधिकारी पदाचा पदभार गुरुवारी (दि १२) दुपारी १वाजता स्विकारला. यावेळी सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
मुख्याधिकारी गोसावी यांनी नगरपरिषदेतील खाते प्रमुखांची ओळख करून घेऊन त्यांच्या कामकाजाबाबत माहिती घेतली. नगरपरिषदेतील उपस्थित पदाधिकारी मंडळींनी गोसावी यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. जून २०२१ पासून रिक्त असलेल्या कोपरगाव नगरपरिषद मुख्याधिकारी पदावर अखेर शांताराम गोसावी ज्यांच्या नियुक्तीचे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अवर सचिव सचिन सहस्रबुद्धे यांनी बुधवारी (ता.११) आदेश काढले आहेत. त्यांची कोपरगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी या पदावर बदली करण्यात आली असून त्यांना कोपरगाव येथे रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते. गोसावी हे यापूर्वी धुळे महानगरपालिका येथे मुख्याधिकारी सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत होते. कोपरगाव नगर परिषदेचे माजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची बदली झाल्यानंतर मुख्याधिकारी पदाची जागा रिक्त होती. या जागेवर प्रभारी म्हणून शिर्डी काकासाहेब डोईफोडे मुख्याधिकारी काम पाहत होते. सध्या कोपरगाव हद्दीमध्ये कोरोना संक्रमणाबरोबर येऊ पाहणाऱ्या नगरपालिका निवडणुका यामुळे नवनियुक्त मुख्य अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.