नोटीसव्दारे पत्रकारांची गळचेपी करणा-या अहमदनगर महानगरपालिकेच्या धोरणाचा जाहीर निषेध
Public protest against Ahmednagar Municipal Corporation’s policy of strangling journalists through notices
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed18 August 16:00
कोपरगाव : कोविड १९ लसीकरणाबाबत संदर्भात विचारलेल्या प्रश्नाबाबत सामनाचे जिल्हा पत्रकार मिलिंद देखणे यांना अहमदनगर महापालिकेने इत्यंभूत माहिती व पुरावे तीन दिवसात कार्यालयात सादर करावे अशी नोटीस काढली ही नोटीस म्हणजे पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रकार असून अहमदनगर महानगरपालिकेच्या या धोरणाचा कोपरगाव तालुका प्रेस क्लब, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे.
१५ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन भवन येथे कोविड १९ लसीकरणाबाबत पत्रकार परिषद आयोजित केली होती या पत्रकार परिषदेमध्ये सामना दैनिकाचे जिल्हा पत्रकार मिलिंद देखणे यांनी आमदार पालकमंत्री यांना कोविड १९ लसीकरणासंदर्भात लस बाहेर विकली जाते असा प्रश्न उपस्थित केलेला होता. याबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांनी सामना चे जिल्हा पत्रकार मिलिंद देखणे यांना आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत इत्यंभूत माहिती व पुरावे तीन दिवसात सादर करावे अशी नोटीस दिली आहे. त्यामुळे अशी नोटीस म्हणजे पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रकार असल्यामुळे नगरसह जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून अहमदनगर महानगरपालिकेच्या या धोरणाचा कोपरगाव तालुका प्रेस क्लब, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे.