मुस्लीम समाज नेहमीच पाठीशी उभा राहिला:आ. आशुतोष काळे

मुस्लीम समाज नेहमीच पाठीशी उभा राहिला:आ. आशुतोष काळे

The Muslim community has always stood by its side. MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir20 August 19:00

कोपरगाव : तालुक्यातील मुस्लीम समाजाने नेहमीच काळे परिवारावर प्रेम केले असून हा मुस्लिम समाज आजही नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

मुस्लिम समाज कमिटी तसेच बागवान समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कोपरगाव तालुक्यातील मुस्लीम विकास समाजाच्या तालुकाध्यक्षपदी आयुब कादर शेख व शहराध्यक्षपदी साजिद सलीम शेख तसेच कोपरगाव तालुका बागवान बिरादरी समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक मेहमूदखाँ बागवान, फकीराभाई बागवान, सदर सिराजभाई बागवान, नायब सदर महेराजभाई बागवान, सेक्रेटरी फारुकभाई बागवान, खजिनदार जावेदभाई बागवान या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोपरगाव तालुक्यात मुस्लीम समाजाने सामाजिक एकोपा जपला आहे. राजकीय, सामाजिक कामात मुस्लीम कमिटी अग्रेसर राहिली असून कोपरगाव तालुका व शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवून शहराला दिशा देण्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. मुस्लीम समाजासाठी विविध समाजोपयोगी विकास कामांसाठी ३४ लाख रुपये निधी आ. आशुतोष काळे यांनी दिल्याबद्दल मुस्लीम समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, मंदार पहाडे, असलम शेख, सलीम पठाण, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, मुन्ना मन्सुरी, फकीर कुरेशी, ॲड.शादाब शेख, मौलाना यासीन मिल्ली, ॲड .अर्शद शेख, असिफ शेख, इमरान बागवान, युसुफ शेख आदींसह मुस्लीन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page