प्रेमीयुगुलांना खुणविणारा हिंगणी वाडा; ग्रामस्थांसाठी ठरतोय डोकेदुखी
वृत्तवेध ऑनलाईन
कोपरगाव:
दिवसाआड पावसाची रिपरिप सुरू आहे. पाऊस जवळपास मुक्कामीच आहे. अनेक दिवसांपासून कोरोनाने लॉक झालेली मंडळी पाऊस कधी एकदाचा पडतो याच प्रतिक्षेत होती. वरुणकृपेने ती सुखावली आहेत. या सुखावलेल्या जीवांना आता त्यांची निवांत भेटीची क्षेत्रे खुणावू लागली आहेत. कोपरगाव जवळील या खुणावणाऱ्या स्पॉट्सविषयी.
हिंगणीचा वाडा
कोपरगाव शहराच्या नैऋत्येला सुमारे ७ किलोमीटरवर मुर्शदपुर हिंगणी रस्त्यावर गोदावरी नदी पात्रात २ कि.मी. परीघ असलेल्या तटबंदीचा अर्धवट हिंगणी चिरेबंदी राघोबादादा
वाडा आहे. त्याची उंची पायथ्यापासून २१ मीटर आहे. हा परिसर अत्यंत आल्हाददायक, शांत आणि निसर्ग़रम्य म्हणून ओळखला जातो.निवांत असलेल्या याही हिंगणीतील राघोबादादा वाड्यात प्रेमी युगलांची वर्दळ वाढली आहे. कारवाई करण्याची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
कोरोनामुळे प्रेमीयुगुलांना भेटीगाठी घेणे अवघड झाले आहे त्यामुळे या प्रेमीयुगुलाने शहरापासून दूर निवांत निसर्गरम्य वातावरण असलेल्या
हिंगणी ग्रामपंचायत हद्दीतील तीन भिंतीच्या वाडयातील राघोबादादा पेशवे यांच्या समाधीस्थळ परिसराचा निवडला आहे. त्यांच्या जोडीला हुल्लडबाज पर्यटकांची वर्दळ वाढल्याने हिंगणी ग्रामस्थांची डोकेदुखी वाढली असून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोदावरीतीरी हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत आलेल्या राघोबादादां पेशवे यांचा हा अर्धवट बांधलेला वाडा आहे. हा वाडा गावाबाहेर गोदावरी नदीच्या काठी असुन याठिकाणी बंधारा बांधल्यामुळे बाराही महिने पाणी असते वाडयाच्या एका बाजुला शेतजमिनी तर दुसऱ्या बाजुला गोदावरी नदी व दाट काटेरी झुडपे आहेत या रस्त्यावर वर्दळ तशी कमीच असते. याचा फायदा घेत प्रेमी यूगलांनी आपला मोर्चा हिंगणी गावाबाहेरील निर्जन अशा उघड्या भिंतीचा वाडयात वळवला असुन भेटीगाठींचा जनु अड्डाच बनवला आहे.
या ठिकाणी प्रेमी युगुल राजरोसपणे गळ्यात गळे घालुन अश्लील चाळे करताना येथे आढळुन येतात.या प्रकारामुळे सदर ठिकाणी अनैतिक संबंधातुन खुन,आत्महत्या,तसेच लुटालुट असे गुन्हे घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.तसेच काही हुल्लड बाज तरूण तरुणी वाड्याच्या उंच भिंतीवरून चढुन मोबाईल वर सेल्फी काढणे, भिंतीवरून धावणे असे प्रकार करत असतात. यामुळे नकळत तोल जाउन गंभीर जखमी होण्याची प्रसंगी प्राण गमावण्याची वेळ येउ शकते. सदर ठिकाणी या अगोदर अशा प्रकारचे अपघात घडले, असुन ग्रामस्थ तसेच सरपंच व पोलीस पाटील यांनी अशा मंडळींना हुसकावुन लावण्यात यश मिळवले असुन प्रसंगी, सदर मंडळी कडुन बाचाबाची तसे धमकावण्याचे प्रकार घडल्याची माहीती गावचे पोलीस पाटील कुमारपंडीत पवार यांनी दिली आहे.या वाड्याच्या सुरक्षेसाठी पुरातत्त्व खात्याने लक्ष देऊन सदर वाड्यावर चढण्यासाठी असलेले दरवाजे बंद केले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.
अशा प्रेमीयुगलावर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी पोलीस पाटील पंडित पवार, दत्तात्रय पवार ,त्रिभुवन पवार अदि ग्रामस्थांनी केली आहे.