कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला शिक्षकांची ५० हजाराची मदत

कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरला शिक्षकांची ५० हजाराची मदत

50 thousand teachers help Karmaveer Shankarrao Kale Kovid Center

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Wed 25 August 17:20

कोपरगाव : कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने कर्मवीर शंकरराव काळे कोविड केअर सेंटरला ५० हजाराची मदत दिली असून या मदतीचा धनादेश नुकताच आमदार आशुतोष काळे यांच्याकडे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला आहे.

आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात जम्बो कोविड केअर सेंटर व एसएसजीएम महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे डेडीकेटेड कोविड केअर सेंटर सुरु केले. त्याठिकाणी उपचार घेत असलेल्या बाधितांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यांनी प्रशासनाला व आरोग्य विभागाला सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिल्यामुळे कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला. आजही रुग्ण अतिशय कमी आहेत. आ. काळेंच्या या समाजकार्याला ५० हजाराची अल्पशी मदत दिली असल्याचे शिक्षकांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विलासराव वाकचौरे,  रयतचे एन.एस. सोनवणे,  सुरेश बोळीज, गजानन शेटे, अरुण बोरनारे, प्रवीण नीळकंठ, नरेंद्र ठाकरे, रामदास गायकवाड, भास्कर काजळे, मनोहर म्हैसमाळे, कर्णासाहेब शिंदे, रमेश मोरे, उमेश पवार, दिपक भोये आदीसह शिक्षकबंधू उपस्थित होते. आ. आशुतोष काळे म्हणाले मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना केल्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन बेडची निर्माण झालेली कमतरता भरून काढण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ५० ऑक्सिजन बेडचे काम प्रगतीपथावर आहे. दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यामुळे ऑक्सिजनच्या बाबत अडचणी येणार नाहीत. तरीदेखील भाविष्यात अजूनही उपाययोजना करतांना मागेपुढे पाहणार नाही. या जीवघेण्या कोरोना संकटात माध्यमिक शिक्षक संघटना सामाजिक बांधिलकी जोपासत मदतीसाठी पुढे आली हा समाजासाठी वेगळा आदर्श असून त्यांनी दिलेली मदत स्वागतार्ह असल्याचे   सांगितले.   

Leave a Reply

You cannot copy content of this page