संजीवनीच्या १८ विद्यार्थ्यांची  टीसीएस मध्ये निवड  –  अमित कोल्हे

संजीवनीच्या १८ विद्यार्थ्यांची  टीसीएस मध्ये निवड  –  अमित कोल्हे

Selection of 18 students of Sanjeevani in TCS – Amit Kolhe

 संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu26 August 15:20

कोपरगांवः संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या १८  विध्यार्थ्यांना  टाटा कन्सलटनसी सर्विसेस (टीसीएस) या बहुतांशी  क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या  बहुराष्ट्रीय    नांमांकित कंपनीने नोकऱ्यांसाठी  निवड केली आहे. यातील सर्वच विद्यार्थ्यांना  सुरूवातीस सुमारे रू ३. ५  लाखांचे वार्षिक  पॅकेज देवु केले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री. कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की टीसीएस कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवड केलेल्या  विद्यार्थ्यांमध्ये  संकेत विजय वालझडे, भगवान अशोक शिंदे , आदित्य राजेश  डोंगरे, दिपक मोहन निकम, मानसी सुनिल अमृतकर, अभय राजेंद्र पानगव्हाणे, महेश  पोपटराव शिंदे , शुभम  माधवराव डांगे, पुणम संभाजी सौदागर, तृप्ती राजेंद्र महाजन, अनिकेत शशिकांत  मते, ऋतुजा सुभाष  दंडवते, शिवम  वैभव दर्शने , प्रतिक शरद गमे, यशवंत रावसाहेब गुरसळ, निकिता दिनेश  काबडे, गणेश  संजय कराळे व  अंकुश  तुकाराम केदार यांचा समावेश  आहे.
माजी मंत्री श्री. शंकरराव  कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या  हाताला काम मिळावे, त्यांना अभियांत्रिकेचे शिक्षण मिळावे म्हणुन १९८३  साली अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना करून सर्व सामान्य कुटूंबातील मुला मुलींना नोकरी मिळण्यात इतपत सक्षम केले. मागील पस्तीस वर्षाच्या  कालखंडात कोपरगांवसह शेजारील तालुक्यातील हजारो विद्यार्थी इंजिनिअर केले, काही स्वतःच्या हिमतीवर वेगवेगळ्याा क्षेत्रात नोकऱ्या  करीत आहेत तर काहींना संस्थेच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने नोकऱ्या  मिळवुन दिल्या आहेत. विशेतः  या अभियानात कोपरगांव शहरासह तालुक्यातील प्रत्येक खेड्यातील  विद्यार्थ्यांचा  समावेश  आहे. आज कुटूंबातील एखाद्यााला नोकरी मिळाली तर तो किंवा ती त्या कुटूंबाचा आधार बनुन ते कुटूंब प्रगतीच्या मार्गाकडे वाटचाल करते. असे हजारो कुटूंब संजीवनीच्या प्रयत्नाने स्थिरस्थावर झाले आहेत.
विद्यार्थ्यांच्या  निवडीबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष शंकरराव  कोल्हे व कार्याध्यक्ष  नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, विश्वस्त   सुमित कोल्हे  यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, सर्व विभाग प्रमुख यांचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page