अवैध वाळूचा ट्रॅक्टर पकडला, पोलिसांकडून कारवाई; गुन्हा दाखल

अवैध वाळूचा ट्रॅक्टर पकडला,
पोलिसांकडून कारवाई; गुन्हा दाखल

Illegal sand tractor caught,
Action by police; Filed a crime

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu26 August 17:20

कोपरगाव : बुधवारी (दि.२५) रोजी रात्री ८.४०वा. कुंभारी गावाचे जवळ सब स्टेशन पॉईंट जवळ गोदावरी नदीपात्रात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. कोपरगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी २ लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बुधवारी(२५) रोजी रात्री८.४० वा. सुमारास कुंभारी गावाचे जवळ सब स्टेशन पॉईंट जवळ गोदावरी नदीपात्रात आरोपी नवनाथ सजन कदम रा. कुंभारी हे एक निळ्या रंगाचा विना क्रमांकाचा स्वराज ७३५ ट्रॅक्टर व त्यास लाल रंगाची दोन चाकी हायड्रोलिक ट्रॉली जुना वापरता किंमत अंदाजे २ लाख ५० हजार १०हजार रुपये किमतीची १ ब्रास शासकीय वाळू वरील ट्रॅक्टर च्या ट्रॉली मध्ये भरलेली मिळुन आली.

पोकॉ.८६२ अंबादास रामनाथ वाघ
यांचे फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्या ट्रॉलीतून १० हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू व ट्रॅक्टरसह ट्रॉली असा २ लाख ६० हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. १२६४  व्ही.एन. कोकाटे हे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page