मंजूर बंधाऱ्याचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु – आ. आशुतोष काळे
Work on preparation of approved Manjurdam budget started – Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 27 August 17:40
कोपरगाव :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील मंजूर, चास, हंडेवाडी, धामोरी, मोर्वीस, मायगाव देवी, कारवाडी, वेळापूर, बक्तरपूर आदी गावांच्या शेतीसाठी वरदान ठरणा-या मंजुर बंधा-याचे माती परीक्षणानुसार डिझाईनचे काम (प्रारूप आराखडा) पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी मायगाव देवी येथे रस्त्याचे खडीकरण व लोकार्पण प्रसंगी दिली .
आ. काळे पुढे म्हणाले की, कोपरगावच्या पश्चिम भागातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री रेणुका माता देवस्थानास माजी आमदार अशोक काळे यांनी त्यावेळी मंजूर केलेली पाणी योजना तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण होवू शकली नाही. तो पाणी प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. धारणगाव,सोनारी, मायगाव देवी, मंजूर (प्रजिमा-८) या अंदाजे ९ किलोमीटर रस्त्यासाठी ७ कोटी रुपये निधी मंजूर झाले असून लवकरच या कामाला सुरुवात होईल पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठी अडचण दूर होणार आहे. तालुक्यातील इतर देवस्थानांप्रमाणे श्री रेणुका माता देवस्थानचा विकास करून भविकांची होत असलेली गैरसोय दूर करणार असल्याचे आ आशुतोष काळे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, सदस्य अनिल कदम, श्रीकृष्णराव गाडे, सुदामराव गाडे, प्रभाकर गाडे, धोंडीराम गाडे, रविंद्र गाडे, दिलीप गाडे, सरपंच दिलीप शेलार, उपसरपंच मुकुंदराव गाडे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम ग्रामस्थ उपस्थित होते.