तुमच्यापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार– आ. आशुतोष काळे
I will continue my efforts to bring water to you. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 27 August 18:00
कोपरगाव : आमची गावे गोदावरी कालव्याच्या शेवटच्या टोकाला येत असल्यामुळे कालव्यांचे पाणी वेळेवर मिळत नसल्याच्या अडचणी राहाता तालुक्यातील त्या अकरा गावातील शेतकऱ्यांनी मांडल्या, त्यावर तुमच्या पर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी माझे प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी चितळी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करताना दिली.
कालवे दुरुस्तीसाठी ५५ कोटींचा निधी मिळाला आहे तसेच महाविकास आघाडी सरकारने निळवंडे धरणाच्या कामाला देखील गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे हि कामे पूर्ण झाल्यानंतर तुमची अडचण निश्चीतपणे दूर होणार आहे . असेही आ. काळे म्हणाले,
आ. आशुतोष काळे म्हणाले २००४ साली राहाता तालुक्यातील अकरा गावे कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडली. त्यावेळी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे यांना अकरा गावातील नागरिकांनी मोठे मताधिक्य देवून निवडून दिले. त्यातून उतराई होण्यासाठी त्यांनी जेवढा निधी कोपरगाव तालुक्यातील गावांना दिला तेवढाच निधी या अकरा गावांसाठी देखील दिला. मात्र मागील पाच वर्षात या अकरा गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झाली असून यात बदल करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करून गावाच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावू तसेच लोकप्रतिनिधी व रयत उत्तर विभाग अध्यक्ष या नात्याने शाळा इमारतीचा प्रश्न व शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी गौतम बँक चेअरमन बाबासाहेब कोते, सरपंच सौ. दीपाली वाघ, धनगरवाडी सरपंच साहेबराव आदमाने, उपसरपंच अनिल रक्टे, दिलीप चौधरी, आण्णासाहेब कोते, अनिल कोते, विनायक देठे, बाबासाहेब वाघ, रुपेश गायकवाड, अंजाबापू रक्टे, रेवननाथ वाघ, पत्रकार विष्णु वाघ, नितीन वाकचौरे, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, महावितरणचे अभियंता सचिन बेंडकुळे, मंडलाधिकारी श्रीमती कावेरी आदिक, कृषी सहाय्यक राजेश पऱ्हे आदी उपस्थित होते. पुणतांबा, चितळी-दिघी, वाकडी-एकुरखे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून अनेक रस्त्यांचे प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असून काही रस्त्यांना मंजुरी देखील मिळाली आहे व चितळी ते खैरी या रस्त्याचे देखील काम लवकरच मार्गी लावणार असल्याचे आ. काळे यानी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक रेवणनाथ वाघ यांनी केले.सूत्रसंचलन दीपक वाघ यांनी केले तर आभार वाकचौरे यांनी मानले.