आपेगावात कोरोना प्रतिबंध शिबिरात २०१ जणांचे कोरोना लसीकरण

आपेगावात कोरोना प्रतिबंध शिबिरात २०१ जणांचे कोरोना लसीकरण

Corona vaccination of 201 people at Corona Prevention Camp in Apegaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 27 August 19:20

कोपरगाव : कोरोना जागतिक महामारीत स्वतःच्या आरोग्याबरोबरच गावचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे लसीकरण महत्त्वाचे असून गावकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच मंगल ज्ञानेश्वर भुजाडे व उपसरपंच किसन सोपानराव गव्हाळे  यांनी केले. कोरोना प्रतिबंध शिबिरात २०१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

यावेळी किसन गव्हाळे म्हणाले,  गेल्या पावणेदोन वर्षांपासून कोरोना महामारीचा संसर्ग वाढला आहे. त्यात  संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे व संजिवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवानेते, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी सातत्याने गाव पातळीवर लक्ष केंद्रित करून कोरोना योद्ध्यासह  असंख्य नागरिकांना व निराधार व्यक्तींना आधार देण्याचे काम केले आहे.  भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी महिलांमध्ये याविषयी जागृती करून बचतगटांच्या भगिनींना सहकार्य केले ,  गावातील युवकांनी घरोघरी जाऊन लसीकरणासाठी रेजिस्ट्रेशनसाठी सहकार्य केले.
या शिबीरात ग्रामसेवक,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, आपेगाव सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रेय पाटोळे, उपाध्यक्ष आसाराम सोमा पगारे, मंगलताई पाटोळे, शैलाबाई खिलारी, सर्व ग्रामपंचायत व  सोसायटीचे सदस्य आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

Leave a Reply

You cannot copy content of this page