कोरोनाच्या काळात शिक्षक बँकेत झालेल्या बदल्या व पदोन्नतीची चौकशी करा—सदिच्छा मंडळ
जिल्हा ऊपनिबंधक (सहकार) अहमदनगर निवेदन
कोपरगाव : कोरोनाच्या कालावधीत संपुर्ण देश अडचणीत आहे. याकाळात बदल्या व पदोन्नती करु नये असे शासनाचे निर्देश असतांनाही, अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत गेल्या तीन/चार महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल्या व पदोनत्या करण्यात आल्या आहेत.या सर्व बाबीची चौकशी होऊन संचालक मंडळावर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे व कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी जिल्हा ऊपनिबंधक (सहकार) अहमदनगर यांना समक्ष भेटुन निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या वतीने जिल्हा ऊपनिबंधक (सहकार) यांची शिष्टमंडळाने समक्ष अहमदनगर येथे भेट घेऊन चर्चा करण्यात आली. कोरोनाच्या काळात प्राथमिक शिक्षक बँकेत मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या. ज्या कर्मचार्यांच्या बदल्या होऊन एक वर्षही पुर्ण झाले नव्हते,त्यांना पुन्हा पुर्विच्याच ठिकाणी नेमणुका देण्यात आल्यात,मग यापुर्वी बदली करुन बँकेचा पैसा का खर्ची घालण्यात आला? बँकेच्या कर्मचार्यांच्या गैरसोईच्या बदल्या करायच्या व नंतर “आर्थिक लाभ” पदरात पाडुन त्याची पुन्हा सोय केलेली दाखवायची हा किळसवाणा प्रकार गेल्या पाच वर्षांपासुन चालु आहे. तसेच शिक्षक बँकेत कर्माचार्यांचे प्रमोशन करतांना मोठ्या प्रमाणात अनियमितता असुन त्यातही मोठा “लाभ” संचालक मंडळाने मिळवला आहे! सदर दोन्ही बाबींची चौकशी होऊन संचालक मंडळ ,बदली झालेले व पदोन्नती मिळालेले कर्मचारी यांची नार्को चाचणी करावी म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल,अशी मागणी माळवेंसह ,विनोद सोनवणे,रामकृष्ण काटे,बप्पासाहेब शेळके,संतोष टकले,महादेव गांगर्डे,अण्णा कांदळकर,सतिष डावरे,चंद्रकांत मोरे,बाळु मोरे,सुधाकर बोर्हुडे,शैलेश खनकर,सुनिल झावरे,कारभारी बाबर आदिंनी केली आहे.