मायलेकींना मारहाण व विनयभंग प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल तीन जणांना अटक
Three persons have been arrested in connection with the case of assault and molestation of Mileki
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 27 August 20:20
कोपरगाव : कोपरगाव शहरातील फिर्यादीच्या राहते घरासमोर १०५ हनुमान नगर कोपरगावामध्ये मायेचा विनयभंग करून मुलीस मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिसात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तीन जणांना अटक देण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, गुरूवारी (२६) रोजी दुपारी चार वा. चे सुमारास फिर्यादीची मुलगी त्यांचे राहत्या घरासमोर साठलेले पाणी झाडून लोटीत असताना ती म्हणाली की लोकांच्या दारात पाणी येते लक्ष देता येत नाही याचा राग येवून यातील आरोपी अमजद जाफर मन्यार , आवेज अमजद मनियार,रुबीना समजत मणियार, उजमा मनियार, जेबिन जरा मनियार,सोनू जलार मणियार सर्व राहणार १०५ हनुमान नगर कोपरगाव यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून यातील आरोपी नंबर एक याने हातातील लोखंडी गजाने यातील फिर्यादीत मजकूर याचे उजव्या हातावर व पायावर मारून जखमी केले आरोपी नंबर दोन तीन चार पाच सहा यांनी फिर्यादी ची मुलगी हीच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने मुलगी जखमी झाली आहे, शिवीगाळ दमदाटी केली व यातील आरोपी नंबर एक याने फिर्यादीचा हात धरून मी तुझी आता इज्जत घेतो असे म्हणून वाईट भावनेने व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, अशी तक्रार पीडित महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून,आरोपी अमजद जाफर मन्यार , आवेज अमजद मनियार व सोनू जलार मणियार या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स.फौ.एस. जी. पवार करीत आहेत.