माहेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी; अकरा गावांना मिळणार आरोग्यसेवा-आ.आशुतोष काळे
Approval of Mahegaon Primary Health Center; Eleven villages will get health services – MLA Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 28 August 19:00
कोपरगाव : २०१४ साली झालेल्या सत्तांतरामुळे माजी आमदार अशोक काळे यांच्या माहेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रेंगाळलेल्या प्रस्तावाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महा विकास आघाडी सरकारकडून माहेगाव देशमुखच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळाल्याने परिसरातील अकरा गावांना आरोग्यसेवा मिळणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली, तर भविष्यात गरज भासल्यास या आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करू असेही ते यावेळी म्हणाले,.
माहेगाव देशमुख येथे माजी आमदार अशोक काळे यांच्या हस्ते ५ कोटीच्या प्राथमिक केंद्राच्या इमारतीचे व रस्त्यांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. माहेगाव देशमुख, कोळपेवाडी, कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी आदी गावांना आरोग्य सेवा मिळणार आहे. आ. काळे पुढे म्हणाले , इच्छाशक्ती असेल तर सत्ताधारी आमदारांना विकास कामे करण्यास व निधी आणण्यात मर्यादाच नाही, कोरोना चे संकट असतानाही हे मी आणलेल्या कोट्यावधीच्या निधीतून मी व जनता अनुभवत आहे. सत्ता नसतानाही २००४ ते २०१४ या दहा वर्षात माजी आमदार अशोक काळे यांनी मतदार संघात मोठमोठाली कामे केली आहेत. मग मात्र मधल्या काळातील पंचवार्षिकला दुर्लक्ष झाल्याने मंजुरी मिळाली नाही.असा टोला त्यांनी लगावला. यावेळी सरपंच, उपसरपंच यांनी ग्रामस्थांच्या वतीने आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. यावेळी कारभारी आगवन, राजेश परजणे, सुधाकर दंडवते, अर्जुनराव काळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक माहेगाव सोसायटीचे चेअरमन रविंद्र काळे यांनी केले तर आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी मानले.
यावेळी सभापती सौ. पोर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, संभाजी काळे, जी.प. सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, कारभारी आगवन, पं.स. सदस्य अनिल कदम, श्रावण आसने, मधुकर टेके, रोहिदास होन, दिलीपराव दाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत वाकचौरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, अभियंता उत्तमराव पवार, शाखा अभियंता राजेंद्र दिघे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.