मतदार संघात सर्वाधिक सामाजिक सभागृहे मंजुर करून ती पूर्ण केली -सौ स्नेहलता कोल्हे
It was completed by sanctioning most of the social halls in the constituency – Mrs. Snehalta Kolhe
कोपरगांव: राजकारणांत अनेक कंगोरे असतात पण आम्ही कुटील राजकारण नव्हे तर विकासकामांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्टा आपल्या ठायी आहे.म्हणूनच मतदार संघात सर्वाधिक सामाजिक सभागृहे मंजुर करून ती पूर्ण केल्याचेही भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी वारी येथे सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी अभिमानाने सांगितले.
वारी-कान्हेगांव परिसरात ग्रामविकास निधी अंतर्गत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमांतुन ६० लाखाच्या तीन सभागृहापैकी एका सभागृहाचे लोकार्पण शनिवारी त्यांनी केले. नंतर त्यांनी देवीमंदिर व जयबाबाजी या प्रत्येकी २५ लाखाच्या दोन्ही सभागृह कामाची पाहणी केली. कोरोना महामारीत सर्वोत्कृष्ट कार्य करणां-या आशासेविका, डाॅ पुजा बोर्डे, डाॅ. वरज अजेय गर्जे, अंगणवाडीताई, पोष्ट, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सोसायटी सदस्य, कर्मचारी, खाजगी वैद्यकिय व्यावसायिक, विद्युत कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, गोदावरी बायोरिफायनरी, गांवपातळीवरील ज्येष्ठ श्रेष्ठ यासह शंभर कोरोना योध्दयांचा सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी माजी सभापती मच्छिंद्र टेके होते. उपसरपंच सौ मनीषा विशाल गोर्डे यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, कोल्हे कारखाना संचालक फकिरराव बोरनारे, हिंमतराव भुजंग, प्रकाश गोर्डे, बाबुराव गोर्डे, पोपटराव गोर्डे, आप्पासाहेब गोरे, बापूसाहेब टिक्कल, वसंतराव गोरे, दिवाकर निळे, सौ नंदा निळे, विशाखा निळे, सुवर्णा गजभिये, अनिल गोरे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर वेताळ, प्रशांत संत, विशाल गोर्डे, बंटी खैरनार यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मच्छिंद्र टेके म्हणांले की, कोपरगांव विधानसभा मतदार संघाच्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम धावुन मदत करण्यांत कोल्हे कुटूंबियांचा राज्यात लौकीक आहे. तोच वारसा युवानेते विवेक कोल्हे यांच्यात असुन कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहवा केली. जनतेची सेवा करून विवेक कोल्हे स्वतःला सिध्द करत आहेत. आशा, अंगणवाडी सेविकासह सर्वांनी जीव धोक्यात घालुन कोरोना काळात काम केले त्या सामाजिक कार्यातुन उतराई व्हावी हाच प्रयत्न आहे. सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणांल्या की, कोरोनो आपत्तीत सर्वसामान्यांसह अनेकजण होरपळले., अनेकांचे छत्र गेले अशाही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रशासनांने देशात कुठेही भूकबळी होवु दिला नाही. कोरोना लसीकरणात मोलाची भूमिका बजावत सर्वाधिक लसींची मात्रा महाराष्ट्र राज्याला उपलब्ध करून दिली असे त्या शेवटी म्हणांल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल गोर्डे, डाॅ. सर्जेराव टेके यांनी केले.