विवेक कोल्हे यांचे मुळे कोरोना  रुग्णांना नवे  जीवदान – दवंगे.

विवेक कोल्हे यांचे मुळे कोरोना  रुग्णांना नवे  जीवदान – दवंगे.

Vivek Kolhe gives new life to Corona patients – Davange.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 29 August 15:00

कोपरगाव :  जिल्हा बँकेचे संचालक,  युवानेते विवेक कोल्हे यांच्या मुळे हजारो कोरोना रुग्णांना नवे जीवदान मिळाले असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांनी केले.

  तालुक्यातील मुर्शतपुर येथे शेकडो कोरोना योद्ध्यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठान व मुर्शतपुर ग्रामस्थांच्या वतीने नुकताच सन्मान नुकताच करण्यात आला त्याप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते.          

   याप्रसंगी सर्वश्री, अन्वर भाई शेख, मधुकर उगले, रामदास शिंदे, त्र्यंबक दवंगे, संदीप उगले, दिलीप शिंदे, रंगनाथ उगले, नाना शिंदे,  सुधाकर शिंदे, जालिंदर शिंदे, प्रकाश दवंगे,  राजू दवंगे,  सुहास दवंगे, जगन्नाथ दवंगे, संदीप गुरुळे, असलमभाई शेख, आरिफ शेख, शिवाजी शिंदे,  कर्णi शिंदे, चंद्रकांत दवंगे, ज्ञानदेव दवंगे बाळू आवारे, संजय घोडेकर,  गोटू शिंदे,  गणेश मोरे, सिताराम तिपायले, श्री. गाडेकर आदि पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आप्पासाहेब दवंगे पुढे म्हणाले की, कोरोना महामारीत माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी कोविड व डेडीकेट सेंटर उघडून त्याद्वारे उपचारातील त्रुटी दूर करत हजारो रुग्णांना दिलासा व मोफत सेवा दिली.  ही संपूर्ण कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी एक आशादायी बाब आहे.  उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांचाही कोरोना योद्धा म्हणून रामदास शिंदे व सहकाऱ्यांनी सत्कार केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page