१२ वर्षांच्या मनस्वी  आढावकडून आरोग्य सेवा माहिती देणाऱ्या को-केअर ॲपची निर्मिती 

१२ वर्षांच्या मनस्वी  आढावकडून आरोग्य सेवा माहिती देणाऱ्या को-केअर ॲपची निर्मिती 

Creation of health care information co-care app from 12 years of Manasi Aadhav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 29 August 16:00

कोपरगाव :  कोविड हाॅस्पिटल आणि रुग्णसेवेशी निगडित  आरोग्य सेवा केंद्रांची माहिती देणारा व तातडीचे सेवेसाठी सर्वांना उपयुक्त ठरणारा मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये असलेल्या को-केअर ॲपची निर्मिती कोपरगाव च्या १२ वर्षांच्या कु मनस्वी मंदार आढाव हिने हैदराबाद येथील व्हाईट हॅटच्या  ज्युनिअर  शिक्षिका मोनिका सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर  केली आहे.

 या ॲपमध्ये कोविड रुग्णालय यांची नावे,पत्ता, उपलब्ध बेड, हाॅस्पिटलचा फोन नंबर,कोरोना व्यतिरिक्त सर्व तज्ञांचे हाॅस्पिटलची नावे,पत्ता, तसेच सोनोग्राफी व रेडिओलॉजी केंद्र, सिटीस्कॅन, रक्तपेढी, रुग्णवाहिका यांचे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहे. तसेच तालुक्या बाहेरील आरोग्य सुविधा देणारे रुग्णालयांची नावे मोबाईल नंबर उपलब्ध असणार आहेत. 
ॲपची शुभारंभ प्रांताधिकरी गोविंद शिंदे यांचे शुभहस्ते करण्यात आला . तहसीलदार योगेश चंद्रे यांनीही ॲपचे कौतुक केले आहे. कु.मनस्वी ही कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष व मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अड.शंकरराव आढाव व  सौ. रंजना आढाव, यांची नात आहे.  काका वैभव, काकी गीतांजली, वडील मंदार व आई जान्हवी आढाव परिवाराने तिला प्रोत्साहन दिले.

Leave a Reply

You cannot copy content of this page