न्यायालयातून विकास कामे अडविली; तेंव्हा आत्मचिंतनाची हीच वेळ – कुदळे

न्यायालयातून विकास कामे अडविली; तेंव्हा आत्मचिंतनाची हीच वेळ – कुदळे

Development work blocked by court; So this is the time of introspection – Kudale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 29 August 19:00

 कोपरगाव : आरोप-प्रत्यारोपाशिवाय राजकारण अधुरे हे जरी सत्य असले तरी विकास कामांना आडकाठी नको, असे असताना चक्क न्यायालयातून आडकाठी आणली गेली याबाबत आत्मचिंतन करण्याची हीच वेळ असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे यांनी  केले .

श्री कुदळे म्हणाले, शहरातील पिण्याचे पाणी आणि खराब रस्त्यांमुळे ग्राहक मंदावल्याने काही वर्षापासून कोपरगावच्या बाजार पेठेला ग्रहण लागले आहे. त्यात कोरोनाचे सावट यामुळे आधीच हौस त्यात पडला पाऊस अशी कोपरगावची गत झाली आहे. आ.आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शहरातील रस्त्यांसाठी उपलब्ध करून दिलेला कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेच्या गलिच्छ राजकारणापायी खर्च होत नाही ही शहरवासीयांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.

तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्यामुळे व्यावसायिकांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत.ज्या रस्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असता त्या रस्त्यांना न्यायालयात जाऊन अडविणे हे कोणत्याही सूज्ञ नागरिकाला निश्चितपणे रुचणारे नाही. त्यामुळे राजकारण किती आणि कुठपर्यंत करायचे हे पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. विकासाची प्रामाणिक अपेक्षा असलेले काळे-कोल्हे सारखे सर्व सामान्यांचा विचार करणारे दिग्गज नेते लाभले आहेत. मात्र राजकीय आकसापोटी जी विकासकामे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून थांबवली जात आहे हे कोपरगाव शहराच्या विकासासाठी घातक आहे.त्यामुळे यापुढे कोपरगावच्या विकासाचा विचार करणारे लोकप्रतिनिधी नगरपालिकेत पाठविणे काळाची गरज आहे.

चौकट:-कोपरगाव तालुका साखर कारखाने, दूध संघ, शैक्षणिक संस्था यांनी आर्थिक सक्षम असतानाही ही आर्थिक उलाढाल मात्र शेजारच्या तालुक्यात होते. न्यायालयात जाणा-यांनी याचा बोध घेऊन विकासाच्या आड येणाऱ्या कुटिल राजकारणाला तिलांजली देणे गरजेचे आहे.- पद्माकांत कुदळे (माजी नगराध्यक्ष)

Leave a Reply

You cannot copy content of this page