संकटात मदत करणे हा तर कोल्हे घराण्याचा वसा -सौ. स्नेहलता कोल्हे
Helping in crisis is the fat of the Kohle family. Snehalta Kohle
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Mon 30 August 19:20
कोपरगाव : थोरा मोठ्यांचे आशीर्वाद कामाला येतात, म्हणूनच पुन्हा पुन्हा सामाजिक कार्याला बळ मिळत राहते, मदत ही मोठी बाब नाही. संकटात मदत करणे हा तर कोल्हे घराण्याचा वसा असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी वारी कान्हेगाव येथे कोरोना योद्ध्यांच्या सन्मान प्रसंगी केले.
आपण स्वतः अपंग त्यात कोरोनाचा कहर चालू झाला, मोलमजुरी बंद. मुलगी बाळंतपणाला आली, तिचे बाळंतपण कसे करावे हा प्रश्न. घरात खाण्यासाठी काही शिल्लक नाही. कोरोनामुळे बाहेरचे तर सोडाच पण घरचेही मदतीला येईना. कोण काय मदत करते हे फक्त ऐकून होतो, अशा सार्या कठीण प्रसंगात फक्त संजीवनी धावून आली आणि क्षणार्धात संकटाचे ढग दूर झाले, ही परिस्थिती तत्कालीन सौ स्नेहलता कोल्हे यांचे समोर कथन करताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते आभार कोणत्या शब्दात मानावे हे दिलीप अहिरे यांना सुचत नव्हते. अशा वेळी मच्छिंद्र टेके यांनी वारीच्या उपसरपंचांना आपली कहाणी कळवली आणि त्यांनी अपंग निधीतील किराणा एका दिवसात घरी पाठवला असेही अहिरे म्हणाले. अहिरे पुढे म्हणाले की, आपल्या गरोदर मुलीला कोरोना काळात दवाखान्यात बाळंतपणासाठी दाखल करून घेत नव्हते, तिला बाळंतपणासाठी कुठे न्यावे हा प्रश्न होता, आणि खिशात पैसेही नव्हते. अशा वेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी तात्काळ त्यांनी यंत्रणा हलवली रुग्णवाहिका करून दिली. जिवावर बेतणारे कठीण प्रसंगात संजिवनी युवा प्रतिष्ठानचे दातृत्व आपल्याला कामी आले. अशा भावना गहिवरल्या शब्दात त्यांनी व्यक्त केल्या.