समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन

समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन

Publication of Samataj Sports Champ’s special issue

 कोपरगाव: राष्ट्रीय हॉकी पटू मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिनी समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये क्रीडा क्षेत्रात मिळविलेल्या प्राविण्याबद्दल विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यानिमित्ताने ‘समताज स्पोर्टस चॅम्प’ विशेषांकाचे प्रकाशन अध्यक्ष काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या विशेषांकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकाराविषयी माहिती व खेळाविषयी आवड निर्माण व्हावी, यावेळी काका कोयटे म्हणाले कि,’खेळामुळे आरोग्य सुदृढ बनते त्यामुळे विविध क्रीडा प्रकारातून त्यांचे आरोग्य सुदृढ बनविण्याचे प्रयत्न समता सदैव करत असल्यामुळे समताचे नाव महाराष्ट्रात नावारूपाला आणून झेंडा फडकविला आहे.’ तर समता पॅटर्न नुसार इ.१० वी आणि इ.१२ वी च्या परीक्षेमध्ये जिल्ह्यात आणि तालुक्यात यश संपादन केले. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यात स्कूल व्यवस्थापन मंडळ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे समता स्कूलचा प्रत्येक सेवक हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. या अनुषंगाने देखील समता विशेष प्रयत्न करत आहोत. असे ही ते म्हणाले, सूत्रसंचालन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी केले विद्यार्थी व पालकांनी फेसबुक द्वारा ऑनलाइन शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींची विशेष परिश्रम घेतले. एल.के.जी.व यु.के.जी.तील विद्यार्थी उपस्थित होते. आभार क्रीडा शिक्षक रोहित महाले यांनी मानले

Leave a Reply

You cannot copy content of this page