कोपरगांव बाजार समितीत मायक्रोफासेन स्पीकरचा वापर

कोपरगांव बाजार समितीत मायक्रोफासेन स्पीकरचा वापर

Use of Microfasen Sipkar in Kopargaon Market Committee

कोपरगांव बाजार समितीत मायक्रोफासेन स्पीकर  वापर कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर स्पीकर

कोपरगांव  : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना कोविडविषयक नियम घालून दिले आहेत त्या नियमांचे पालन होत असतांनाच येथील  कोपरगांव कृषी  उत्पन्न बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत कांदा लिलाव सुरु असतांना बाजारभाव ऐकणार्‍यांची गर्दी कमी करण्यासाठी लिलाव पुकारा करणार्‍या कर्मचार्‍याजवळ मायक्रोफोन स्पिकर देण्यात आला आहे.

या स्पिकरमुळे संपूर्ण बाजार समितीच्या आवारात प्रत्येक वाहनधारक व कांदा विक्रेता शेतकर्‍यास आपल्या वाहनाजवळ बसून बाजारभाव ऐकतायेत असल्याने होणार्‍या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात बाजार समितीला यश आले आहे. सध्याच्या डिजीटल युगात एक आदर्श डिजीटल बाजार समितीकडे कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सुरु आहे. बाजार समितीचा आत्मा असलेल्या शेतकर्‍यांना समितीच्या वतीने पिण्याचे शुद्ध पाणी, शेतकरी निवास, मानसन्मान आणि इतर सुविधांवर भर दिला जात आहे. त्याच बरोबर बाजार समितीच्या सर्व घटकांना सुचना, नियम आदि ऐकवण्यासाठी संपूर्ण बाजार आवारात ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. सद्यस्थितीत या लाऊडस्पिकरद्वारे कोरोनाविषयक नियमांची जागृती केली जात आहे. मात्र बाजार आवारात लिलाव सुरू असलेल्या लिलावात शेतकरी गर्दी करतात. ही गर्दी टाळण्यासाठी येथील बाजार समितीने थेट शेतकर्‍यांनपा त्यांच्या वाहनाजवळ बसून काय बाजारभाव चालू आहे हे ऐकण्यासाठी कांदा पुकारणार्‍या कर्मचार्‍याला मायक्रोफोन स्पीकर(माईक) देण्यात आला आहे. बाजार आवारात लिलाव सुरू होताच बाजारभाव काय निघतो यासाठी शेतकर्‍यांची मोठया प्रमाणात गर्दी होते. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीमायक्रोफोन  स्पिकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लिलावात होणार्‍या गर्दीचे प्रमाण कमी होणार आहे अशी माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे उपसभापती राजेंद्र निकोले, सचिव नानासाहेब रणशुर व सर्व संचालक मंडळ यांनी दिली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page