कृपाशंकरसिंग यांची नेमणूक; मतासाठी इतका बेशरमपणा- विजय वहाडणे
Appointment of Kripashankar Singh; So much shamelessness for votes – Vijay Wahadne
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 31 August 09:30
कोपरगाव : रा.स्व.संघातून भाजपात आलेले अनेक प्रामाणिक, ध्येयवादी कार्यकर्त्यांना डावलून कालच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी काँग्रेसमधून आलेले, व ज्यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक चौकश्या चालू असलेले माजी मंत्री कृपाशंकरसिंह यांची नेमणूक करण्यात आली. मते मिळविण्यासाठी इतका बेशरमपणा अशा शब्दांत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे भाजप ला घरचा आहेर दिला आहे. आदर्श व्यक्तिमत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छ प्रतिमा व रा.स्व.संघाच्या कार्यकर्त्यांची साथ असतांना बाहेरून उसने आणण्याची गरज काय? असा सवालही वहाडणे यांनी केला आहे ,
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष खेड्यापाड्यात, सर्वसामान्य जनतेत पोहचविण्यासाठी स्व.उत्तमराव पाटील, वसंतराव भागवत, रामभाऊ म्हाळगी,हशू अडवाणी, सूर्यभान वहाडणे,राम नाईक,राम कापसे, गंगाधर फडणवीस,प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, डॉ.लेले, भाऊराव अत्रे अशा अनेक नेत्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच राज्यात-देशात सत्ताही मिळाली. अनेकांना काम करण्याची संधी मिळाली. असे पत्रकात नमूद केले आहे.
विजय वहाडणे म्हणाले, मतांचे राजकारण फक्त आपल्यालाच कळते असे काही नेत्यांना वाटत असेल.मी एक लहान कार्यकर्ता असूनही असे सांगू ईच्छीतो कि, काहीही करून मतेच मिळवायची असतील तर मुस्लिम मते मिळविण्यासाठी दाऊद इब्राहिमलाही पक्षात घ्यायला काय हरकत आहे.
वर्षानुवर्षे असंख्य कार्यकर्त्यांनी कष्ट करून भाजपाची इमारत उभी केली आहे.कृपया या इमारतीचे रुपांतर भंगारच्या गोडाऊनमधे करू नका. असे आवाहन त्यांनी केले. इतर पक्षातून नेते आयात करता येतील पण प्रामाणिक, एकनिष्ठ कार्यकर्ते मात्र दुरावतील याचे भान ठेवा.असा सल्ला वहाडणे यांनी पत्रकातुन दिला आहे.
मी याआधीचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचेकडे कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी मिळावा म्हणून ३ वेळा प्रस्ताव दिले.पण एका ढबूचीही मदत मिळाली नाही. आयारामांच्या नादी लागून इतिहास विसरू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चौकीदार चोर है असे अनेकदा बोलले गेले तेंव्हा भाजपाचे महाराष्ट्रातील बडे नेते का काही बोलले नाहीत? स्वतः शेपूट घालून बसायचे व ना.नारायण राणे यांना बोलायला लावायचे हे योग्य नाही. असा टोलाही वहाडणे यांनी पत्रकातून लगावला आहे.
Post Views:
313