विकासात सर्वच गावांना प्राधान्य देणार – आ. आशुतोष काळे

विकासात सर्वच गावांना प्राधान्य देणार – आ. आशुतोष काळे

All villages will be given priority in development – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 31 August 09:20

कोपरगाव : तालुक्यात रस्त्यांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला असून विकासाच्या बाबतीत सर्वच गावांना प्राधान्य देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी धामोरी येथे भूमिपूजनप्रसंगी केले.

धामोरी येथील मायगाव देवी चौफुली ते नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय होवून या रस्त्याला ठिकठिकाणी अनेक मोठ-मोठे खड्डे पडले होते. या रस्त्याचे तातडीने नुतनीकरण करावे अशी नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती.ती पुर्ण झाल्यानंतर धामोरीकरांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून आभार मानले. यावेळी धामोरीचे अशोक वाघ यांनी राष्ट्रवादीत कॉंग्रेस प्रवेश केला.   यावेळी सुधाकर दंडवते, अर्जुनराव काळे, चन्द्रशेखर कुलकर्णी, नारायणराव मांजरे, माधवराव खिलारी यांनी मनोगत व्यक्त केले .

 यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, अनिल कदम,  पुंडलीक माळी, भगवान माळी,  नारायण भाकरे, कचरू भाकरे,  भास्करराव  मांजरे, भास्करराव  वाघ, राहुल जगधने, संकेत कडवे, शिवाजीराव मांजरे, सुदामराव गाडे, नारायण बारे,  अभियंता दिलीप गाडे, ग्रामविकास अधिकारी एफ.एम. तडवी, ग्रामस्थ, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.    

Leave a Reply

You cannot copy content of this page