कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ लाखाचे विमा कवच; कोपरगाव बाजार समितीचा निर्णय

कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५ लाखाचे विमा कवच; कोपरगाव बाजार समितीचा निर्णय

Insurance cover of Rs 5 lakh each to employees; Decision of Kopargaon Market Committee

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue 31 August 09:50

 कोपरगाव : बाजार समितीतील सर्व सेवा देणाऱ्या  व कर्तव्य पार पाडताना मरण पावलेल्या प्रत्येक  कर्मचाऱ्यांसाठी मृत्यूपश्चात प्रत्येकी ५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय आज सोमवारी (३०) रोजी सभापती संभाजी रक्ताटे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालकांच्या  बैठकीत घेण्यात आला. असून २० कर्मचाऱ्यांना विमा कवच देण्यात आले आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटात प्रत्येक भारतीय  धैर्याने तोंड देत आहे.  अशा कठीण प्रसंगातही कोपरगाव बाजार समितीमधील सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयाचे विमा कवच बाजार समिती मार्फत देण्यात येणार याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत  घेण्यात आला आहे.  या विमा सुरक्षा कवच योजनेचा लाभ बाजार समितीतील २० कर्मचार्‍यांना मिळणार आहे. अशी माहिती सभापती संभाजी रक्ताटे उपसभापती राजेंद्र निकोले व सचिव नानासाहेब रणशूर यांनी दिली आहे. बाजार समितीने विमा कवच देण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचारी वर्गात समाधानकारक  वातावरण आहे. त्यामुळे कोविड लढाईत मृत्यू झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page