संजीवनीच्या १६ विद्यार्थ्यांची  इन्फोसिसमध्ये प्लेसमेंट- अमित कोल्हे

संजीवनीच्या १६ विद्यार्थ्यांची  इन्फोसिसमध्ये प्लेसमेंट- अमित कोल्हे

Placement of 16 Sanjeevani students in Infosys – Amit Kolhe

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण  काळात ३.५ लाखाचे  प्रिमिअम पॅकेजचे प्लेसमेंट Placement of 3.5 lakh premium package for students during training period

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 2 sep 2021, 16:00Pm.

कोपरगाव : कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत इन्फोसिस या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अभियांत्रिकीच्या १६ विद्यार्थ्यांना आकर्षक पॅकेजची  प्लेसमेंट  मिळवून देत  संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने देशातील अभियांयत्रिकी शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागात एक अढळ असा विश्वास संपादन केल्याची माहिती  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

नामांकित कंपन्यांनी प्रिमिअर पॅकेजचे प्लेसमेंट विद्यार्थ्यांना देऊन संजीवनी अभियांत्रिकीच्या शिक्षण प्राणालीवर नेहमीप्रमाणेच मोठा विश्वास व्यक्त केला आहे.   आकर्षक पॅकेजची प्लेसमेंट्‌स विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गांत समाधानाची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

अमित कोल्हे म्हणाले, संजीवनीच्या प्रयत्नातुन विविध नामांकित कंपन्यांनी प्रिमिअर पॅकेजचे प्लेसमेंट ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना देऊन संजीवनी अभियांत्रिकीच्या शिक्षण प्राणालीवर नेहमीप्रमाणेच मोठा विश्वास व्यक्त केला आहे. सध्याच्या करोना महामारीच्या काळात सर्वच क्षेत्रातील अर्थकारण कोलमडले असुन यात ग्रामिण भागाला मोठा फटका बसला आहे. अशा  परीस्थितीत आकर्षक पॅकेजची प्लेसमेंट्‌स  विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकवर्गांत समाधानाची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.
इन्फोसिस या कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये  आनंद  सोनवणे, आरती  जाधव, सचिन  घुगरे, जयेश  सैंदाने, पियुष  अवचर, श्रध्दा शिरोदे, महेश वानखेडकर, ऋतुजा  पानगव्हाणे,  प्राची  झावरे, प्रतिक  चौधरी , सिध्देश सदाफळ, प्रशांत खंगल, सुरेखा पवार, प्रिती परजणे, किरण मिटके व अंजली जाधव यांचा समावेश  आहे.

माजी मंत्री व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष  नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी निवड झालेले विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले तसेच डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page