कोपरगावात साई चरित्र पारायण सोहळ्याची सांगता
Concluding Sai Charitra Parayan ceremony at Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu2sep 2021, 19:00Pm
कोपरगाव : श्रावण महिन्यानिमित्त कोपरगावात साई चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . सलग सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यासाठी भाविक उत्साहात सहभागी झाले होते . दरवर्षी मुंबादेवी मंडळ व सुवर्णकार मित्र मंडळाच्या वतीने उपनगराध्यक्ष योगेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा या सोहळ्याचे १६ वे वर्ष आहे.
श्रावन महीना सुरु झाला की, सर्वत्र धार्मिक कार्यक्रमांची सुरवात होते. मुंबादेवी तरुण मंडळाचा साईचरित्र पारायण सोहळा महत्वाचा उत्सव असतो. गेल्या दोन वर्षापासून कोरोना चे संकट असतानाही सात दिवस चालणाऱ्या या पारायण सोहळ्यास मोठ्या भक्तीभावाने सुरवात झाली होती .
कोरोनाचे नियम व अटी मुळे साई चरित्र पारायण सोहळ्यात ५१ भाविकांनी सहभाग घेतला होता .
पारायण समाप्ती गुरुवारी २ सप्टेंबर रोजी सराफ बाजार येथील सुवर्णकार समाज मंदिर या ठिकाणी दुपारी बारा वाजता वैजापूर येथील जनार्दन स्वामी आश्रमाचे परमपूज्य दत्तगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते साईबाबांच्या महाआरतीने करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत श्री व सौ. विक्रमादित्य सातभाई संजीवनी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनीही महाआरती केली.
साई चरित्र पारायण सोहळा समाप्ती प्रसाद म्हणून यावर्षी तीन हजार साईभक्तांना बुंदी प्रसाद व साईनाथ स्तवन मंजिरी या पुस्तकाचे घरपोच वाटप करण्यात आले अशी माहिती मंडळाचे ज्ञानेश्वर गोसावी यांनी दिली.
या श्री साईबाबा महाआरती सोहळ्यास माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, नगरसेवक अतुल काले,स्वप्निल निखाडे, विजय आढाव, अनिल जाधव, विनोद राक्षे ,शिवसेना गटनेते योगेश बागुल, तुलसीदास खुबाणी, विजय भडकवाडे, नंदकुमार विसपुते, बाळासाहेब नरोडे, नारायणशेठ अग्रवाल, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, रवी रोहमारे, राहुल सूर्यवंशी, रंजन जाधव, पप्पू पडियार, विनोद चोपडा, तात्या राऊत, सागर जाधव, राहुल आढाव, दत्तात्रय ऊदांवत, सजंय मंडलिक, शरद कुलकर्णी, नंदु देवळालीकर, विनायक बाविस्कर, चंन्दुकाका बाविस्कर, प्रकाश भडकवाडे आदीसह भाविक मंडळाचे सभासद उपस्थित होते.