दिव्यांग बंधू भगिनींना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार

दिव्यांग बंधू भगिनींना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार

Divyang brothers and sisters will do their utmost to help them become self-reliant in life

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat4sep 2021, 15:00Pm.

 कोपरगाव: दिव्यांग बंधु-भगिनींना आपल्या जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो व दिव्यांग असल्यामुळे त्यांचे जीवन काहीसे परावलंबी असते. त्यामुळे या दिव्यांग बंधू भगिनींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन आयुष्यात स्वावलंबी करण्याच्या उद्देशातून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन आ. आशुतोष काळे यांनी शनिवारी (४) रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय येथील दिव्यांग साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिरात आपल्या भाषणातून दिले.

आ. आशुतोष काळे म्हणाले, दिव्यांगांना गरजेनुसार उपकरणांचे वाटप करण्यात येणार आहे.हजारो रुपये खर्च करून हि ज्या सुविधा मिळणार नाहीत व त्यासाठी खूप कष्ट दिव्यांगाना पडतात, ती पडू नयेत म्हणून अतिशय महागडी उपकरणे व साहित्य पूर्णपणे मोफत मिळणार आहेत. हि दिव्यांगांसाठी सुवर्णसंधी आहे त्याचा जास्तीतजास्त गरजू दिव्यांगांनी लाभ घेऊन त्याचा योग्य वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.शनिवारी (४) रोजी सकाळी ११ वाजता कृष्णाई मंगल कार्यालय येथील दिव्यांग साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिरातील आपल्या भाषणात केले. या वेळी डॉ. अजय गर्जे, तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, उपसभापती अर्जुनराव काळे, अधिकारी विलास कोलगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी एच.पी.एच सहाय्यक मानद सचिव विलास कोलगावकर, जनरल मॅनेजर एडमिन ऑपरेशन एच.पी.एच. अत्रीनंदन ढोरमारे, जनरल मॅनेजर एडमिन ऑपरेशन एच.पी.एच. कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी  आगवन, कारखान्याचे व्हाईस चेअरमन सुधाकर रोहम, संचालक पद्माकांत कुदळे सभापती पौर्णिमा जगधने, झेडपी सदस्य सुधाकर दंडवते,मनसेचे अनिल गायकवाड आदीसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनसे दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, सूत्रसंचालन अशोक आव्हाटे, व आभार प्रदर्शन बाळासाहेब रुईकर यांनी केले.

चौकट

कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ व फेलोशिप ऑफ द फिजिकल हॅन्डीकॅप्ड आयोजित शिबिरामध्ये दिव्यांग बंधू-भगिनींसाठी आवश्यक असणारे व्हीलचेअर, कृत्रिम पाय, ज्येष्ठ नागरिक स्टिक, कुबड्या, कमोड चेअर, एलबो चेस्ट, फोल्डिंग वॉकर, सी.पी.चेअर, तीनचाकी सायकल यांसारख्या आवश्यक वस्तूंकरीता नाव नोंदणी करण्यात आली .

Leave a Reply

You cannot copy content of this page