पॅराऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची १९ पदकांची कमाई; खेलो इंडिया अभियानाचे यश – विवेक कोल्हे.

पॅराऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची १९ पदकांची कमाई; खेलो इंडिया अभियानाचे यश – विवेक कोल्हे.

Indian athletes win 19 medals in Paralympics; Success of Play India Campaign – Vivek Kolhe.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lMon6sep 2021, 15:50Pm.

कोपरगाव : पाच दशकानंतर जगात वर्चस्व सिद्ध करताना भारतीय खेळाडूंनी पॅराऑलम्पिक स्पर्धेत गौरव व भूषणास्पद कामगिरीतून सर्वाधीक १९ पदकांची केलेली कमाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खेलो इंडिया अभियानाच्या यशाची सुरुवात असल्याचे प्रतिपादन संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.

विवेक कोल्हे म्हणाले,भारतीय संघाने सन १९६८ नंतर प्रथमच ५ सुवर्ण, ८ कास्य ६ रौप्य अशी १९ पदके जिंकली. तब्बल ५३ वर्षानंतर देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी भारतीय संघाची ही कामगिरी जागतिक कीर्तीची व अभिमानाने मान उंचविणारी आहे. क्रीडा क्षेत्रात ग्रामीण, शहरी भागातील खेळाडूंना आवश्यक ते मार्गदर्शन दिले तर ते देखील उद्याचे जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतात,या विचारातूनच संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी परिसरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे, खेळाडूंनीही विविध क्रीडा क्षेत्रात राज्य व देश पातळीवर बक्षीस पटकावून नावलौकिक मिळवला आहे आता यापुढे ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत आपले खेळाडू कसे यशस्वी होतील याचे नियोजन सुरू आहे,संजीवनी युवा प्रतिष्ठान देखील या कार्यात अग्रभागी असते असेही ते म्हणाले.

Leave a Reply

You cannot copy content of this page