कोपरगाव ब्राह्यण सभेकडून समाज बांधवांचा गुणगौरव – मकरंद को-हाळकर
Praise of Samaj Brothers from Kopargaon Brahmin Sabha Makrand KorHalkar
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue7sep 2021, 10:14Am.
कोपरगांव: सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या तीन वर्षात एस.एस.सी. परीक्षा ते पदवी,पदव्युत्तर विद्यार्थी शिक्षक प्राचार्य, व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीचा गुणगौरव शिक्षक दिनी ब्राह्मण सभा मंगल कार्यालयात ब्राह्मण सभेचे कडून करण्यात आला.अध्यक्षस्थानी संपादक महेंद्र कुलकर्णी होते.
भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब्राह्यण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर यांनी तर स्वागत उपाध्यक्ष राजेंद्र जवाद, बी.डी.कुलकर्णी,यांनी केले.
याप्रसंगी नगर भा.ज.पा.शहराध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे यांच्या हस्ते पारीतोषिक वितरण करण्यात आले.नासिकचे प्रसिध्द उद्योगपती धनंजय बेळे प्रमुख पाहुणे होते.
यावेळी सुधाप्पा कुलकर्णी, संजय सातभाई, सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, प्रसाद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षपदावरून बोलताना संपादक महेंद्र कुलकर्णी म्हणाले,युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावार उदयोगात भरारी घ्यावी असे सुचविले.
धनंजय बेळे म्हणाले, समाजाचे संघटन करणे खुप अवघड काम असुन सर्व समाज घटकांनी त्यासाठी एक विचाराने राहणे आवश्यक आहे.
भैय्या गंधे यांनी ब्राह्यण उपक्रमांचे कौतुक करुन मदत करण्याचे आश्वासन दिले.
प्रसाद नाईक यांनी मंगल कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असुन येत्या जानेवारीत ते सर्वासाठी खुले होईल असे सांगितले.
कार्यक्रमासाठीवसंतराव ठोंबरे, डॉ.मिलींद धारणगांवकर, ॲड.सौ. श्रध्दा जवाद, सौ.वंदना चिकटे, खजिनदार जयेश बडवे, संघटक महेंद्र कुलकर्णी, सहसचिव संदीप देशपांडे, अजिंक्य पदे,सदा धारणगांवकर, सहखजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक गौरीष लव्हरीकर यांनी परिश्रम घेतले. बहुसंख्य समाजबांधव, विद्यार्थी,आजीमाजी शिक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुत्रसंचलन अनिल कुलकर्णी व सौ.रुपाली देशपांडे यांनी केले.आभार संजीव देशपांडे यांनी मानले.सुरभी कुलकर्णी हीच्या सुरेल पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.