शिक्षक हा विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि भविष्य घडविणारा शिल्पकार -सौ स्वाती कोयटे

शिक्षक हा विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि भविष्य घडविणारा शिल्पकार -सौ स्वाती कोयटे

The teacher is the sculptor who shapes the character and future of the students – Mrs. Swati Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue7sep 2021, 10:34Am.

कोपरगाव– शिक्षण आणि विद्यार्थी यांना जोडणारा दुवा म्हणजे शिक्षक असून सुसंकृत, नवनवीन तत्वज्ञान, कौशल्य, यातुन एक आदर्श पिढी तयार करणारा शिक्षक हा विद्यार्थ्यांचे चारित्र्य आणि भविष्य घडविणारा शिल्पकार असल्याचे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूल मॅनेजिंग ट्रस्टी सौ.
स्वाती कोयटे यांनी शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार प्रसंगी केले.

शिक्षकांचा योग्य तो सन्मान करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, यासाठीच डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस ५ सप्टेंबर हा ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणुन पाळण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे या होत्या.

स्कूलचे मुख्य कार्यवाहक संदिप कोयटे म्हणाले , कोरोना काळातही ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आधुनिक शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यापर्यंत पोहचविण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा केवळ शिक्षक दिनी सत्कार न करता विद्यार्थ्यांनी त्यांना सदैव स्मरणात ठेवून त्यांचे यथायोग्य आदरातिथ्य केले पाहिजे.
यावेळी १० वी विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून अध्यापनाचे काम करताना अध्यापन आणि अध्ययन यातील फरक जाणून घेतला.

इ.७ वी तील विद्यार्थ्यांनी सुरेख नृत्य सादर केले. इ.१० वी तील आदिती भंडारी हिने हिंदी तर उन्नती भवर हिने इंग्रजी भाषेतून शिक्षकांविषयी विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार विद्यार्थी कुलदीप कोयटे, रक्षा दोशी, सिद्धांत जोशी, अन्वय बारहाते यांनी केले.

यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य समीर आत्तार यांची प्रमुख उपस्थितीत होती तर स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी इ.१० वी तील सर्वच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

You cannot copy content of this page