शासनाच्या विरोधातील भूमिकेची शिक्षा मिळाली, पण शेतकऱ्यांना मोबदला मिळवूनच दिला -आ. आशुतोष काळे
He was punished for his role in opposing the government, but he paid the farmers. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue7sep 2021, 12:34Pm.
कोपरगाव : तालुक्यातील समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात लाटण्याचा प्रयत्न सुरु होता. सत्ता नसतांना शासनाच्या विरोधात
टोकाची भूमिका घेतली, त्याची शिक्षा मिळाली,ती हसत हसत सहन केली.पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवूनच दिला असल्याचे वक्तव्य आ. आशुतोष काळे यांनी चांदेकसारे येथे एका कार्यक्रमात केले.
आ.काळे म्हणाले की, समृद्धी महामार्गासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बाधित शेतकऱ्यांना टाळले जात असल्यामुळे सत्ता नसतानाही त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिलो आणि शेतकऱ्यांना मोबदला मिळवून दिला एन.एच. १६० च्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या बाबतीत सत्ताधारी आमदार असल्याचा फायदा घेत शासनदरबारी पाठपुरावा करून त्यांना देखील त्यांच्या जिमिनीचा, घरांचा व सरकारी जागेवर वास्तव्यास असलेल्या घरांचा व दुकानांचा योग्य मोबदला मिळवून दिला आहे. भविष्यात देखील ज्या ज्यावेळी शेतकऱ्यांच्या बाबतीत असे प्रसंग निर्माण होतील त्या-त्या वेळी परिणामांची चिंता न करता त्या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे राहू असेही ते शेवटी म्हणाले,
यावेळी सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुनराव काळे, सुधाकर रोहोम, संचालक सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, सौ.अनुसया होन, रोहिदास होन, राहुल रोहमारे, राहुल जगधने, दिलीप शिंदे, शंकरराव चव्हाण, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, धीरज बोरावके, सरपंच बाबुराव थोरात, सरपंच रामदास जाधव, कांतीलाल होन, केशव जावळे, विठ्ठल होन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे आदी उपस्थित होते.
चौकट :- काळे घराण्याचा धार्मिक वसा घेवून वाटचाल करीत असलेल्या आ. आशुतोष काळे यांच्या निष्कलंक चारित्र्यामुळेच शरद पवार यांनी त्यांची श्री साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदासाठी निवड केली आहे.- डॉ. गोरक्षनाथ रोकडे.





