समता स्कूलची राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन विझ किड्स स्पर्धा-सौ.स्वाती  कोयटे

समता स्कूलची राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन विझ किड्स स्पर्धा-सौ.स्वाती  कोयटे

Samata School’s State Level Grand Online Wiz Kids Competition – Mrs. Swati Koyte

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue7sep 2021, 15:34Pm.

कोपरगाव: महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्त समता इंटरनॅशनल स्कूल तर्फे इ. ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय भव्य ऑनलाईन ‘विझ किड्स स्पर्धेचे’ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे यांनी दिली.हि स्पर्धा राज्यातील सर्वच स्पर्धकांसाठी खुली असून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना सौ.स्वाती कोयटे म्हणाल्या, या स्पर्धेसाठी इ. ५ वी ते ७ वी असा ज्युनिअर गट व इ. ८ वी ते १० वी असे दोन गट बनविण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये एकुण ३ फेऱ्या असतील, पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या परिचयासह कोणत्याही एका कला गुणाचे सादरीकरण करून आपला व्हिडिओ संयोजकांना पाठवावयाचा आहे. दुसरी फेरी ही वन-टू-वन इंटरव्ह्यूची असणार आहे. या मध्ये एक तज्ञ परीक्षक पहिल्या राउंड मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची आवड, निवड,छंद,महत्वकांक्षा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि विद्यार्थ्यांचे विशेष कला गुण यावर आधारित प्रश्न असतील, या फेरी मधून तिसऱ्या फेरीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. तिसरी फेरी हि अंतिम फेरी असेल या फेरीत ज्युरी पॅनेल फेरी असेल. या फेरीत ज्युरी पॅनेल विद्यार्थ्यासोबत संवाद साधतील. स्पर्धेतील स्पर्धकाला कोणत्याही प्रकारच्या मानसिक ताणतणावामध्ये न राहता अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत.
प्रत्येक गटासाठी पहिले पारितोषिक चषक, प्रमाणपत्र आणि रु.७,०००, दुसरे पारितोषिक चषक,प्रमाणपत्र आणि रु.५,०००,तिसरे पारितोषिक चषक, प्रमाणपत्र आणि रु.३,००० आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ८४५९१८०१८५, ९९६०५७३४२०, ९९७५८८६६४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Reply

You cannot copy content of this page