आमचा विरोध फक्त त्या ६ वादग्रस्त कामांना-अरिफ कुरेशी
We oppose only those 6 controversial works – Arif Qureshi
कोपरगाव : विकासाच्या २२ कामांना आमचा कुठलाही विरोध नाही प्रश्न फक्त जनतेच्या पैशाची उधळपट्टी असलेल्या त्या ६ वादग्रस्त कामाबाबत आहे. तेंव्हा ऊठसूट आपल्या बगलबच्चामार्फत प्रसिद्धी माध्यमाद्वारे गरळ ओकण्यापेक्षा आ. आशूतोष काळे यांनी शहर विकासाच्या २२ कामांसाठी विशेष सर्वसाधारण सभा बोलावावी असे आवाहन उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
आ. आशूतोष काळे व त्यांच्या नगरसेवकांनी पालिका निवडणुका डोळयासमोर ठेवुन शहरवासियांना त्रास झाला तरी चालेल,पण भाजपा सेना नगरसेवकांना बदनाम करण्याचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. असे स्वार्थी घाणेरडे राजकारण करण्यापेक्षा शहरातील जनतेचे हाल थांबविण्यांसाठी धारणगांवरोड, इंदिरा पथ, बॅंक रोड या तीन प्रमुख रस्त्यासह शहरातील रस्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाला विशेष सर्वसाधारण सभा घेण्यास भाग पाडून स्थानिक पातळीवरच विकास कामांचा प्रश्न निकाली काढावा असे कुरेशी यांनी शेवटी म्हंटले आहे.





