त्यांच्यामुळे नगरपालिकेवर रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की – कृष्णा आढाव

त्यांच्यामुळे नगरपालिकेवर रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की – कृष्णा आढाव

Shame on them for putting pimples on the streets – Krishna Adhav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lTue7sep 2021, 16:34Pm.

कोपरगाव : कोपरगाव शहराच्या २८ कामांना कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी न्यायालयात नेल्यामुळे रस्त्यावर मुरूम टाकण्याची नामुष्की नगरपालिकेवर ओढवली असल्याचा आरोप माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला असून आहे.

शहरातील सुज्ञ नागरिक नक्कीच विचार करतील असेही त्यांनी म्हटले आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे होणारी विकासकामे थांबल्यामुळे आजही शहरवासीयांना पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून आपली वाट शोधावी लागत आहे. पालिका प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी करतांना या रस्त्यांवर मुरूम टाकून सारवासारवी केल्याचा प्रयत्न करून नागरिकांना तात्पुरता दिलासा दिला असला तरी शहरवासीयांचा रस्त्यावरील खड्ड्यातला प्रवास थांबणार नाही, दरवर्षी पावसाळ्यात खराब रस्त्यांचा होणारा त्रास यावर्षी सोसावा लागणार आहे. काही महिन्यावर येऊन ठेपलेली नगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हे गटातील नगरसेवकांनी जाणीवपूर्वक हि विकासकामे कोर्टाच्या कचाट्यात अडकवली आहे. चांगले रस्ते हा हक्क असलेल्या करदात्या नागरिकांवर अन्याय असून सुज्ञ नागरिक याचा नक्कीच विचार करतील असे आढाव यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page