आ. काळेंनी मिळविलेल्या ५ कोटीच्या रस्त्यांची कामे सुरु करा, राष्ट्रवादी मागणी

आ. काळेंनी मिळविलेल्या ५ कोटीच्या रस्त्यांची कामे सुरु करा, राष्ट्रवादी मागणी

Come on. Start work on roads worth Rs 5 crore acquired by Kale, NCP demands

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lWed8sep 2021, 16:34Pm.

कोपरगाव :नगर विकास खात्याकडे आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मिळालेल्या पाच कोटी रुपये निधीतील दर्शविलेले रस्ते तातडीने व्हावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्याकडे आज एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा, श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते आचारी हॉस्पिटल, छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते इंदिरापथ (गोकुळनगरी), श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंप),लुम्बिनी बुद्धविहार रस्ता,एस.एस.जी.एम. कॉलेज समोरील रस्ता व प्रभाग क्र. ४ मधील साईधाम रस्ता आदी प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे.

कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली असून याचा परिणाम शहरातील उद्योग व्यवसायावर होवून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक, महिला, जेष्ठ नागरिक व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे तेंव्हा आमदार आशुतोष काळे यांनी मिळविलेल्या पाच कोटींच्या निधीतून संभवित रस्त्यांची कामे तातडीने सुरू करावीत असे निवेदनात म्हटले आहे

बुधवारी (८)रोजी नगरपालिकेला निवेदन देताना धरमचंद बागरेचा, सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, वर्षा गंगूले, सौ. माधवी वाकचौरे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजी मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, दिनकर खरे, कृष्णा आढाव, बाळासाहेब रुईकर, रावसाहेब साठे, जावेद शेख, संदीप कपिले, डॉ. तुषार गलांडे, ॲड.विद्यासागर शिंदे, सचिन परदेशी, प्रा.अंबादास वडांगळे, कार्तिक सरदार, राजेंद्र जोशी,ॲड. मनोज कडू, प्रकाश दुशिंग, रमेश टोरपे, राजेंद्र आभाळे, चंद्रशेखर म्हस्के आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट :- न्यायालयात गेलेल्या २८ कामामुळे रस्त्याची कामे होऊ शकत नाही आ.आशुतोष काळे यांनी रस्त्यासाठी दिलेल्या ५ कोटी निधीतून रस्त्याची कामे सुरु झाल्यास निश्चितपणे नागरिकांना होणारा त्रास काही अंशी कमी होईल.

Leave a Reply

You cannot copy content of this page