संजीवनी इंजिनिअरींगच्या १५ विद्यार्थ्यांची पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीमध्ये निवड वार्षिक पॅकेज ४.५ लाख

संजीवनी इंजिनिअरींगच्या १५ विद्यार्थ्यांची पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीमध्ये निवड वार्षिक पॅकेज ४.५ लाख-अमित कोल्हे

Selection of 15 students of Sanjeevani Engineering in Persistent Systems Company Annual Package 4.5 Lakh -Amit Kohle

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu9sep 2021, 16:34Pm.

कोपरगांव: आशिया, युरोप आणि युएस मध्ये ग्राहक जाळे असलेल्या साॅफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या पर्सिस्टंट सिस्टिम्स कंपनीमध्ये संजीवनी इंजिनिअरींगच्या १५ विद्यार्थ्यांची ४.५ लाखाच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनंजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.

अमित कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या महाविद्यालयांकडून दिल्या जाणार्‍या कॅम्पस प्लेसमेंटचं आकर्षण असतं आणि ते साहजिक आहे. फी च्या मोठमोठ्या रकमा भरून आणि भरपूर अभ्यास करून घेतलेल्या शिक्षणामुळे मुलांना चांगल्या कंपनीत, चांगल्या पदावर आणि पगारावर नोकरी मिळावी अशी बहुतेक पालकांची आणि मुलांचीही अपेक्षा असते. त्यासाठी शिक्षण संपल्यावर अर्ज करत फिरणं आणि कंपन्यांचे उंबरठे झिजवणं यापेक्षा मुलांना महाविद्यालयांमध्येच कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मोठ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली तर ते हवंच असतं. संजीवनीच्या माध्यमातुन हमखास नोकरी मिळेल, अशी अपेक्षा ठेवतात. ती अपेक्षा आम्ही सातत्याने पूर्ण करीत आलो आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. असे ही ते म्हणाले, गोपाल पाणीग्रही, अनिकेत  मते, सुशांत सबनीस,वैभव जाधव, पुजा पिपाडा, सुजाता चव्हाण, सुशांत भालेराव, योगेश राणे, हिरण पारस, रूपाली  गेरकर, अर्पिंत बोरावके, उत्कर्ष बोरावके, अपेक्षा  गिरी, गायत्री कुलकर्णी व विशाल चौधरी  यांचा समावेश  आहे. माजी मंत्री,संस्थापक अध्यक्ष शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या सर्व टीमचेही अभिनंदन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page