गोदावरी दूध संघ शेतकरी-यांना देणार गायी खरेदीसाठी कर्ज – परजणे

गोदावरी दूध संघ शेतकरी-यांना देणार गायी खरेदीसाठी कर्ज – परजणे

Godavari Dudh Sangh will provide loans to farmers for purchase of cows

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu9sep 2021, 17:00Pm.

कोपरगाव : गोदावरी खोरे दूध संघाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना गायी खरेदीसाठी स्टेट बँकेच्या आर्थिक सहकार्याने कर्ज देण्याचा महत्वपूर्ण निर्णय संघाने घेतला असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी गुरुवारी ४६ व्या वार्षिक सभेत केले.

प्रारंभी संघाचे संस्थापक नामदेवराव परजणे आण्णा यांच्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. दूध संस्था, सेंटर व दूध उत्पादकांना स्टेट बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक विनोदकुमार व शाखा व्यवस्थापक आर. एस. संधानशीव यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. मागील सभेच्या अहवाल वाचन कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी वाचन केले. तर अहवालातील सर्व विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होऊन विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत. राजेश परजणे पुढे म्हणाले, संघाने २०१६ पासून अमेरिकेतून सुधारीत सॉर्टेड सिमेनचा उपक्रमात आतापर्यंत १ हजार ६१० कालवडी जन्माला आलेल्या आहेत. त्यापैकी २२३ कालवडी पहिल्या वेतात आल्या आहेत. त्यांची दूध देण्याची सरासरी प्रतीदिन २६ ते २८ लिटर्स इतकी आहे. पशुरोग निदान प्रयोगशाळा २०१८ पासून कार्यान्वित केली आहे. त्यातून चार हजाराच्या जनावरांवर उपचार केलेले आहेत.पशुसंवादिनी कॉलसेंटर, पशुखाद्य, मिनरल मिक्शर, वैरण पशुचिकित्सकांचा सल्ला व मार्गदर्शन, गायी खरेदी, गोठा दुरुस्ती, कडबाकुट्टी, दूध काढणी यंत्र व इतर आवश्यक साहित्यासाठी अर्थ साह्य बल्क कुलरची व चार ठिकाणी चिलींग प्लॅन्टची उभारणी केलेली आहे. बाजारपेठेत लवकरच ह्युमन अन – टच ( मानवस्पर्श विरहीत ) पॅकींग दुधाची विक्री करण्याचा संघाचा मानस आहे. आज संघाकडे एक हजार लिटर क्षमतेचे ३३ बल्क मिल्क कुलर उपलब्ध असून असेच बल्क कुलर गांवपातळीवर एकाच शेतकऱ्याकडे बसवून त्या शेतकऱ्याचे किमान एक हजार लिटर दूध उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. महानंद डेअरी यांच्या सहकार्याने मिल्क स्कॅन एफटी – १ ही अत्याधुनिक यंत्र सामुग्री संघावर कार्यान्वित करण्यात आलेली आहे. एका मिनीटात सुमारे ३२ प्रकारच्या तपासण्या या यंत्राद्वारे केल्या जातात. लवकरच मुरघासाचा प्रकल्प सुरु करीत आहोत. याशिवाय कोरोना महामारीत मयत झालेल्या संघाच्या दूध पुरवठादारांच्या अनाथ पाल्यांचे १२ वी पर्यंतचे शिक्षण श्री नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेमार्फत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचेही श्री परजणे यांनी सांगितले व्यवस्थापक विनोदकुमार यांनी बँकेमार्फत अर्थसहाय्य करण्याचे आश्वासन दिले . सभेला राजेंद्रबापू जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर,नानासाहेब सिनगर, भागवतराव धनवटे, जयराम पाचोरे, विद्यमान संचालक विवेक परजणे, उत्तमराव माने, निवृत्ती पा. नवले, यशवंतराव गव्हाणे,भाऊसाहेब कदम, भिकाजी थोरात, गोपीनाथ केदार, सदाशिव कार्ले, दिलीप तिरमखे, सौ. सुनंदाताई होन, सौ. कुंदाताई डांगे यांच्यासह दूध उत्पादक सभासद, शेतकरी उपस्थित होते. संचालक उत्तमराव माने यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page