कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईन; दुष्काळी पूर्व भागाच्या विकासासाठी -आ. काळे
Kopargaon Rotegaon Railway Line; Drought for the development of the eastern part -MLA Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu9sep 2021, 17:34Pm.
कोपरगाव : मुंबई-पुणे-नाशिक – औरंगाबाद हा पंचतारांकित औद्योगिक चौकोन साधण्याबरोबर कोपरगावच्या दुष्काळी पूर्व भागाच्या विकासासाठी कोपरगाव रोटेगाव रेल्वे लाईन मंत्रालय स्तरावरील प्रस्तावास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीत आ. आशुतोष काळे यांनी निवेदनातून केली आहे.
आ. आशुतोष काळे यांनी असे म्हटले आहे की, मुंबई-पुणे-नाशिक हा पंचतारांकित औद्योगिक त्रिकोण आहे. कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईन झाल्यास कोपरगाव-मनमाड-रोटेगाव हे ९४ किलोमीटरचे अंतर कमी होऊन औरंगाबाद व जालना ड्रायपोर्टला मुंबई व कोकणाशी जोडणाऱ्या मार्गाचे अंतर कमी होणार आहे. मुंबई-पुणे-नाशिक या पंचतारांकित औद्योगिकत्रिकोणाला औरंगाबाद जोडले जाऊनपंचतारांकित औद्योगिक चौकोन तयार होईल. मराठवाडा व दक्षिणेतील राज्यांमधून शिर्डीला येणाऱ्या भाविकांच्या वेळेची व खर्चाची बचत होईल.तसेच मनमाड रेल्वे स्टेशनवर असलेला अधिकचा भार काही अंशी कमी होण्यास मदत होणार आहे. सदरच्या कोपरगाव-रोटेगाव रेल्वे लाईनवर कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथे रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहे. या रेल्वे स्टेशनमुळे या कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागाचा विकास साधला जाणार आहे. त्याबाबत आपण जातीने लक्ष घालून राज्य सरकारच्या वतीने सदर प्रस्तावास मंजुरी द्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.