निधीसाठी पाठपुरावा करावा लागतो हे उपनगराध्यक्षांना समजणार नाही – नवाज कुरेशी

निधीसाठी पाठपुरावा करावा लागतो हे उपनगराध्यक्षांना समजणार नाही – नवाज कुरेशी

    The vice-president will not understand that he has to pursue for funds – Nawaz Qureshi

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lFir10sep 2021, 18:20Pm.

कोपरगाव : लोकप्रतिनिधी कुणीही असो निधीसाठी पाठपुरावा हा करावाच लागतो व पाठपुरावा केल्यानंतरच मतदार संघातील विकास कामांसाठी निधी मिळतो हे अंगठेबहाद्दर उपनगराध्यक्षांना समजणार नाही अशी टीका रायुकॉ शहरअध्यक्ष नवाज कुरेशी यांच्यावर पत्रकाद्वारे केली आहे.

          दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात पुढे निधी मिळविण्यासाठी काय प्रक्रिया असतात ह्या नेत्याकडून शिकून घ्या. दुसऱ्यावर आरोप करून नागरिकांचे मनोरंजन करण्यापेक्षा शहरविकासासाठी आपली नकारात्मक  भूमिका बाजूला ठेवा. आ. आशुतोष काळे यांनी पाठपुरावा करून दीडच वर्षात कोपरगाव नगरपरिषदेला १२ कोटी निधी आणला आहे. मागील पाच वर्षात ज्यांची राज्यात व केंद्रात एकहाती सत्ता असतांना त्यांना जे जमले नाही ते आ. आशुतोष काळे यांनी करून दाखविले आहे.          

तुम्ही २८ विकासकामांना विरोध केल्यामुळे शहरातील विकास थांबला आहे. कोपरगाव शहरात ज्या प्रभागात विकासकामे केली जातात तो निधी देखील शासनाचाच असतो मात्र प्रभागातील विकासकामांना निधी मिळावा यासाठी त्या-त्या प्रभागातील नगरसेवकालाच पाठपुरावा करावा लागतो हे माहित नसणाऱ्यांनी बालिश वक्तव्य करून लोकांचे मनोरंजन करण्यापेक्षा शहरविकासाला सहकार्य केल्यास निश्चितपणे शहराचा विकास होईल. असा सल्ला त्यांनी दिला.

Leave a Reply

You cannot copy content of this page