कोपरगावसाठी डायलिसिस सेंटर द्या -आ. आशुतोष काळे
कोरोना नियंत्रणाबाबत पालकमंत्र्यांकडून आमदार काळे यांचे कौतुक
- कोपरगाव : कोपरगाव कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनाग्रस्त पाच रुग्णांनी उपचार घेवून कोरोनावर मात केली आहे. अन्य रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे गुरुवारी (९ जुलै) रोजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील झालेल्या कोरोना आढावा बैठकीत केली.
बैठकीत आमदार काळे यांनी मतदार संघातील कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपायांची माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री मुश्रीफ यांनी शेजारच्या चौफेर तालुके हॉटस्पॉट असताना कोपरगावातील परिस्थिती चांगली असल्याबद्दल समाधान व्यक्त करताना आमदार काळे यांचे कौतुक केले .
- यावेळी डायलिसिस सेंटर बरोबरच, साथी रोग निवारणार्थ प्राथमिक आरोग्य केंद्रांना मुबलक औषधे द्या, मागणीप्रमाणे खते व रेशन वेळेवर मिळावीत या अन्य मागण्याही आ. काळे यांनी यावेळी केल्या.
यावेळी झेडपी अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर, जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप आदी उपस्थित होते.