नेवासा ( शहर प्रतिनिधी ) नगर – औरंगाबाद रस्ता ते कल्पवृक्ष , सावतानगर , त्रिवेणीनगर या रस्त्याचे काम तिन वर्षांपूर्वी सुरु झाले होते . हा रस्ता हंडिनिमगाव व नेवाशाला जोडला जातो, परंतु सदर रस्त्याचे काम हे अपूर्ण अवस्थेत आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांच्या दळणवळणा च्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे . या निकृष्ट दर्जाच्या अपुर्ण कामामुळे अपघात वाढले आहेत तो त्वरित पुर्ण करण्यात यावा व ठेकेदारावर व त्यास पाठीशी घालणा-या अधिका-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा शहरप्रमुख नितीन जगताप यांनी दिला आहे .
रस्ता अपूर्ण राहिल्याने सद्यस्थित येथील नागरीकांना येण्याजाण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याने दुचाकी वाहन चालवणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. वयोवृद्ध नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. या रस्त्यावर गेल्या महिन्यात दोन गंभीर अपघात झाले आहेत.
याची दखल घेत रस्त्याचे उर्वरित काम तत्काळ होणे गरजेचे असल्याने ते पुर्ण करण्यात यावे अन्यथा काम पुर्ण न झाल्यास परिसरातील नागरिकांना बरोबर घेऊन शिवसेना स्टाईलने संबधीत विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल.
चौकट. गेल्या तिन वर्षात काम सुरु असलेल्या या रस्त्यावर संबधीत ठेकेदाराला डांबरीकरण करण्यास वेळ मिळत नसल्याने व अधिकारी हि चौकशी केली असता उडवा उडवीचे उत्तरे देत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त करुन या कामामध्ये काय गौडबंगाल आहे याची चौकशी करण्याची मागणी करत आहेत.
फोटो सागर शिंदे अपघात ग्रस्त
चौकट – सागर शिंदे ( अपघात ग्रस्त ) निस्कृष्ठ अर्धवट रस्त्यामुळे मी दुचाकीवरून घरी जात असताना माझा अपघात झाला असून हात फॅक्चर झाला आहे .व मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे .