साकीनाका घटना निंदनीय; नीच प्रवृत्तीचा महिलांच्या वतीने निषेध -सौ स्नेहलता कोल्हे

साकीनाका घटना निंदनीय; नीच प्रवृत्तीचा महिलांच्या वतीने निषेध -सौ स्नेहलता कोल्हे

Sakinaka’s incident is reprehensible; Protest on behalf of low-minded women – Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat11sep 2021, 16:40Pm

कोपरगाव : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार करून नंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. या घटनेत तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून या नीच प्रवृत्तीचा समस्त महिला भगिनींच्या वतीने आपण निषेध व्यक्त करते अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली आहे.

यावर बोलताना सौ स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, अमरावतीत बलात्कार, पुणे,पिंपरी,कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी कोविड सेंटरमध्येही महिला कर्मचारी व महिला रुग्ण सुरक्षित नव्हत्या त्यावेळीही अनेक दुर्दैवी प्रकार समोर आले होते. काल-परवा काम करणाऱ्या महिला अधिकार्‍याचे बोटे छाटली गेली अशा घटना शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राच्या लौकिकाला धक्का लावणार्‍या अशाच या सर्व घटना आहेत. तेंव्हा आता शक्ती कायद्याला मुर्त रूप द्यावे, विद्यमान कायद्यात सुद्धा कठोर तरतुदी केल्या पाहिजेत, महिला आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती झाली पाहिजे. साकिनाकाच्या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे आणि या आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page