वसुंधरेचा वारसा आपण जपला पाहिजे- नरैन दास

वसुंधरेचा वारसा आपण जपला पाहिजे- नरैन दास

We must preserve the heritage of the planet – Naren Das

गोदातरंग वार्षिक अंक प्रकाशन Godatarang Annual Issue Publication

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSat11sep 2021, 17:00Pm.

 कोपरगाव : ज्या वसुंधरेवर आपण राहतो, त्या वसुंधरेमुळे आपले अस्तित्व टिकून त्या वसुंधरेचा वारसा आपण जपला पाहिजे. या वैश्विक उर्जेचे स्मरण ठेवून तिची निरंतर उपासना केली पाहिजे. असे प्रतिपादन ५७ महाराष्ट्र बटालियचे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नरैन दास यांनी सोमय्या व रोहमारे महाविद्यालयात गोदातरंग वार्षिक अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे होते.

अशोक रोहमारे म्हणाले की, “गोदातरंग वार्षिक अंक हा आमच्या महाविद्यालयात वर्षभर संपन्न होणाऱ्या शैक्षणिक आणि इतर घडामोडींचे प्रतिबिंब आहे. गेल्या वर्षीच्या गोदातरंग अंकामध्ये विद्यार्थ्यांनी कोविड  महामारी संदर्भात आपले विचार, अनुभव, कविता, लेख निबंध इ. उत्कृष्ट वाड्मय-निर्मिती केलेली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि या अंकाचे उत्कृष्ट संपादन करणाऱ्या संपादक मंडळास मी धन्यवाद देतो. ऍड. संजीव कुलकर्णी विविध विषयावरील पुस्तके घ्यावीत ती मन लावून वाचावीत आणि त्यातून प्रेरणा घेऊन अंकासाठी लेखन करावे   प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी स्वागत केले. प्रास्ताविक संपादक डॉ. जिभाऊ मोरे यांनी केले, हा अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे आभार प्रा. वर्षा आहेर यांनी मानले. डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला संदीप रोहमारे,सुजित रोहमारे, उपप्राचार्य डॉ. संतोष पगारे, प्रा. व्ही. सी. ठाणगे, डॉ. के. एल. गिरमकर,अधीक्षक डॉ. अभिजीत नाईकवाडे आदी प्राध्यापक वृंद तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच बरोबर एन. सी. सी छात्र तसेच एन. सी. सी. चे छात्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page