मुरुमाने खड्डे भरून सर्वपक्षीयांकडून कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध

मुरुमाने खड्डे भरून सर्वपक्षीयांकडून कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध

Protest against the corporators of Kolhe group from all parties by filling the pits with pimples

कोपरगाव: शहरातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध असताना कोल्हे गटाने विरोध केल्यामुळे रस्ते होऊ शकले नाहीत याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व मनसे यांनी रस्त्यावरील खड्डयात मुरूम टाकून विकास कामांना विरोध करणाऱ्या कोल्हे गटाच्या नगरसेवकांचा निषेध केला.

कोपरगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही २८ विकास कामांचा विषय कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी न्यायालयात नेवून ठेवल्याच्या निषेधार्थ शनिवारी (११) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी निषेध मोर्चा काढून रस्त्यावरील खड्ड्यात मुरूम टाकून रोडरोलरने दाबून नागरिकांची तात्पुरती अडचण दूर केली आहे.

नागरिकांची अडचण तात्पुरती दूर होणार असली तरी कर भरून देखील चांगल्या रस्त्यापासून सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी वंचित ठेवल्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके म्हणाले, महाविकास आघाडी सरकारकडून आ.आशुतोष काळे यांनी बारा कोटी रुपयांचा निधी आणला, हे नागरिक जाणून आहेत परंतु कोटीत किती शून्य असतात हे मात्र उपनगराध्यक्ष यांना माहीत नसल्यास टीका त्यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस व मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Leave a Reply

You cannot copy content of this page