कोेपरगांवातील तळीरामांचा बंदोबस्त करा -दत्ता काले.
Take care of Taliram in Kopergaon – Datta Kale.
कोपरगाव: कोपरगांव शहरवासियांसाठी नव्यांने बांधलेल्या बाजारओटयावर तळीरामांची वाढणारी संख्या चिंताजनक असून ऐन सणासुदीच्या काळात सुरक्षा धोक्यात येऊ शकते त्यामुळे तळीरामांचा तातडींने बंदोबस्त करावा अशी मागणी भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केली.
त्यांनी या मागणीचे निवेदन पोलिस स्टेशन व नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देवुन जिल्हाधिकारी यांचेही लक्ष वेधले आहे. काले यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे, सध्या महिलांवर अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोपरगांव शहरात नव्यांनेच बाजारओटे तयार झाले आहेत त्याठिकाणी दिवसा-रात्री अपरात्री तळीरामांसह गुर्दुल्यांची संख्या वाढत आहे परिणामी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, अशा तळीरामांकडुन तसेच गर्दुल्याकडुन अनुचित छेडछाडीचे प्रकार घडु शकतात, सध्या गणपती, नवरात्र दसरा दिवाळीचे सणासुदीचे दिवस आहेत. कोरोनाचे संकट आहे, याही परिस्थितीत पोलिसांचा धाक नसल्यांने गर्दुले तळीराम मोकाट सुटलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून आपण सातत्यांने मागणी करत आहोत, तेंव्हा कोपरगांव शहरवासियांची सुरक्षीतता धोक्यात येवु नये, यासाठी पोलिस अधिकारी, नगरपालिका प्रशासन यांनी याकडे वेळीच लक्ष देवुन या तळीरामांचा तात्काळ बंदोबस्त करावा, यातुन काही प्रकार उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल तरी या गंभीर बाबीवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी केली.