शिवसेनेचे निवारा येथे मोफत सर्व रोगनिदान शिबीर संपन्न; २०० रुग्णांनी केली तपासणी

शिवसेनेचे निवारा येथे मोफत सर्व रोगनिदान शिबीर संपन्न; २०० रुग्णांनी केली तपासणी

Free all diagnostic camps at Shiv Sena’s Niwara; Examination of 200 patients

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lSun12sep 2021, 17:00Pm

कोपरगाव : कोपरगाव शहर शिवसेना साई समर्थ प्रतिष्ठान निवारा व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने कोपरगाव शहरातील दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळा, निवारा येथे रविवारी (१२) रोजी मोफत सर्व रोगनिदान तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी केले. अध्यक्षस्थानी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले होते.

यावेळी बोलताना देसले म्हणाले पक्ष असो की संघटना प्रत्येकाचे उद्दिष्टे वेगवेगळे असतात परंतु सामाजिक जाणीवेच्या बांधिलिकीतुन उपेक्षित व अत्यावश्यक अशा ठिकाणी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत त्या पोहचविणे हे लक्ष असतं तेंव्हा अशा प्रकारच्या उपक्रम राबविले जातात. परंतु आयोजकांनी आपले लक्ष केवळ रोग निदान शिबीरापुरते न ठेवता रोगाचे समूळ उच्चाटन करून रुग्ण पूर्ण बरा कसा होईल यासाठी पाठपुरावा केला पाहिजे, कारण पुढच्या प्रत्येक शिबिरात नवा रुग्ण दिसला पाहिजे. कारण वेळेवर दिलेला एक टाका पुढचे सात टाके टाकण्यापासून वाचवतो असेही त्यांनी सांगितले. शिवसेना व आयोजकांनी केलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या,

यावेळी डॉ. कृष्णा फुलसुंदर पत्रकार राजेंद्र सालकर, डॉ.झिया शेख डॉ. तुषार साळुंके, महेश गोसावी, दिलीप सोनवणे, राहुल देशपांडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे व सूत्रसंचालन शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले.

या शिबीरात आसपासच्या परिसरातील सुमारे २०० रूग्णांची तपासणी करण्यात आली. यासाठी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे डॉ. अमित नाईकवाडे, डॉ. अशोक तुसे, डॉ. नीरज काळे, डॉ. तेजश्री चव्हाण (नाईकवाडे), डॉ. विशाल काळे, डॉ. पूजा कातकडे, डॉ. तुषार साळुंके, डॉक्टर प्रशांत सगळगिळे, डॉ. मयूर गंगवाल, यांच्या सह सहकारी कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

या शिबीरास शुक्लेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, युवा सेनेचे सुनील भैया तिवारी, वाहतूक सेनेचे इरफान शेख, शेतकरी सेनेचे किरण खर्डे, डॉ. नरेंद्र भट्टड, दिनार कुदळे, अनिरुद्ध काळे, शिवसेना महिला उपजिल्हामुख सपना मोरे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, महिला शहर प्रमुख राखी विसपुते, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते वीरेंद्र बोरावके हशमभाई पटेल, विक्रांत झावरे, विशाल झावरे आदींसह बहुसंख्य नागरिक शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थीत होते.

निवारा शाखा क्रमांक ३ चे गुरमीतसिंग दडियाल, राजेंद्र सावताडकर, राहुल हंसवाल, प्रमोद बोथरा, उमेश छुगानी, करण सोनवणे, सागर महाजन, विक्रांत खर्डे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. शेवटी आभार शिवसेना विधानसभा संघटक असलम शेख यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page