एसएमके कारखान्याच्या सर्वाधिक ऊस उत्पादकाचा बिपिन कोल्हेंच्या हस्ते सत्कार.

एसएमएसके कारखान्याच्या सर्वाधिक ऊस उत्पादकाचा बिपिन कोल्हेंच्या हस्ते सत्कार.

Bipin Kolhe felicitates SMSK factory’s top sugarcane grower

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 15:50Pm.

कोपरगाव :येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या सर्वाधिक ऊस उत्पादक सभासदांचा प्रशस्तीपत्रक, शाल फेटा देऊन अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 २०२०-२१ या हंगामात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे वैजापूर तालुक्यातील नांदूरढोक येथील भास्कर भिमराज शिंदे यांनी पाच एकरात आडसाली को ८६०३२ उसाचे सर्वाधिक विक्रमी ९३ मे. टन, करंजी येथील रामदास केशव बोठे  यांनी आडसाली एकरी ९०.११ मे टन., सोनेवाडी येथील भाऊसाहेब देवराम गुडघे यांनी पूर्वहंगामी ८३.८८ मे टन., पिंपळगाव जलाल येथील भिका लक्ष्मण नरोडे यांनी सुरू एकरी ५५.०८ मे टन, तर मढी खुर्द येथील भाऊसाहेब सूर्यभान गायकवाड यांनी को_एम १०००१ खोडवा वाणाचे एकरी ६१.८५ मे टन, उसाचे उत्पादन घेतले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.             बिपीन कोल्हे म्हणाले की, कोल्हे कारखान्याने सभासदांच्या ऊस उत्पादन वाढीसाठी सातत्याने नवनवीन योजना आणून त्याची संपूर्ण माहिती थेट सभासदांच्या बांधावर देऊन त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन करत आहे,  त्यामुळे प्रत्येक अहवाल सालात सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा यथोचित सन्मान होत असतो.             या प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक सर्वश्री. विवेक कोल्हे फकीरराव बोरणारे, भास्करराव भिंगारे, ज्ञानेश्वर परजने, निवृत्ती बनकर, साहेबराव कदम,  शिवाजीराव वक्ते, अरूणराव येवले, अशोकराव औताडे,  सोपानराव पानगव्हाणे, संजय होन, विलास वाबळे, मनेश गाडे, संगिता राजेंद्र नरोडे, श्रीमती सोनुबाई दशरथ भाकरे, प्रदीप नवले, राजेंद्र कोळपे, मच्छिंद्र लोणारी, कामगार संचालक वेणूनाथ बोळीज, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, रासायनिक विभागाचे व्यवस्थापकिय  व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सचिव विधीज्ञ तुळशीराम कानवडे, केन मॅनेजर गोरखनाथ शिंदे, ऊस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर आदी उपस्थित होते.  कमी पाण्यात, उत्कृष्ट बियाण्यात सर्वाधिक उत्पादन हा माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा मूलमंत्र आपल्याला कामी आला असे  सत्कारास उत्तर देताना ऊस उत्पादक शेतकरी भास्कर शिंदे यांनी सांगितले, शेवटी उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.  

Leave a Reply

You cannot copy content of this page