डॉ. अभिजीत गाढवे यांना प्रवरा महाविद्यालयाची एम. डी. मेडिसिन पदवी
Dr. Abhijeet Gadhve has been Pravara College.M. D. Degree in Medicine
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 16:20Pm.
कोपरगाव : लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने कोपरगांव येथील डॉ. अभिजीत चंद्रकांत गाढवे यांना एम. डी. मेडिसिन ( औषध तज्ज्ञ ) ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
डॉ. अभिजीत गाढवे यांनी कोपरगांव येथील सेवानिकेतन स्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयातून पूर्ण केले. या दोन्हीही ठिकाणी त्यांनी प्रथम प्राविण्य मिळविलेले आहे. तर मुंबई ( सायन ) येथील लोकमान्य टिळक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम. बी. बी. एस. शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात पुढील वैद्यकीय क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यातही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. डॉ. अभिजीत गाढवे यांना प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन एअर व्हाईस मार्शल डॉ. राजवीर बलवार यांच्या हस्ते एम.डी.मेडिसिन ही पदवी बहाल करण्यात आली. डॉ. अभिजीत गाढवे हे गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या या यशाबद्ल माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे विश्वस्त व सचिव डॉ. राजेंद्र विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, संचालक राजेंद्र जाधव यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले.





