समता,स्कुलमध्ये हिंदी दिवस साजरा

समता,स्कुलमध्ये हिंदी दिवस साजरा

Samata, Hindi Day celebrated at school

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन lThu 16sep 2021, 16:30Pm.

 कोपरगाव: कुलदिप कोयटे मुन्शी प्रेमचंद, उन्नती भवर हरीवंशराय बच्चन, जान्हवी जानी सुभद्रा कुमारी चौहान, मृदुला सोनकुसळे   संत कबीर, आर्यन कदम शामसुंदर रावत, ख़ुशी कोठारी मिराबाई भूमिका साकारत हिंदी लेखकांचा परिचय करून देत १४ सप्टेंबर हा ‘जागतिक हिंदी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला .

अध्यक्षस्थानी उपप्राचार्य समीर अत्तार होते. हर्षिता लोकचंदाणी हिने हिंदी भाषेचे महत्व सांगितले इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी हास्य नाटिका सादर करून हिंदी गितांवर अप्रतिम नृत्य सदर केले. इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी चित्रपट डायलॉग सादर केले. दिवसभर विद्यार्थ्यांनी एकमेकांशी हिंदी भाषेतून संवाद साधला.          

समीर अत्तार म्हणाले, हिंदी ही ज्ञान व राजभाषा देखील आहे. तिने  जागतिक स्थरावर व्यावहारिकदृष्ट्या महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. त्यामुळे मातृभाषेबरोबरच हिंदी भाषेला देखील तितकेच महत्व दिले गेले पाहिजे, विद्यार्थ्यांनी इतर भाषादेखील आत्मसात कराव्यात.’         

  समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती कोयटे, शैक्षणिक संचालिका सौ.लिसा बर्धन यांनी हिंदी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. नंदिनी कलंत्री हिने केले. विभाग प्रमुख सौ.शिल्पा वर्मा, हिंदी विभाग प्रमुख  सौ. अनिता आढाव, शिक्षिका सौ.ज्योती घोलप व शिक्षक सुनील साळुंखे, यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले. आभार शिक्षक सुनील साळुंखे यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page